राज्यासह देशामध्ये कोरोनामुळे नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणार आहोत. देशासह राज्यामध्ये सध्या गणेशोत्सवाचे वातावरण आहे. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Breaking News Live Updates: राज ठाकरे यांचा पुणे दौरा अचानक रद्द, आजारी असल्यामुळे घेतला निर्णय

Also Read - PM Narendra Modi Speech: 100 कोटी डोस हा फक्त आकडा नाही, हे देशाच्या सामर्थ्यांचे प्रतिबिंब: PM मोदी
Also Read - Cruise Drugs Party Case: खुशाल जेलमध्ये टाका, मी देशसेवा करत राहणार, समीर वानखेडेंचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर

Live Updates

 • 9:27 PM IST

  “देवेंद्र फडणवीस शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात”

  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं धक्कादायक विधान
  “राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद देऊ नये असा सल्ला मी उद्धव ठाकरेंना दिला होता”
  चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला मोठा गौप्यस्फोट
  “देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात”
  पत्रकारांनी पहाटेच्या शपथविधीवर विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांचे उत्तर

 • 8:27 PM IST

  आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूने खळबळ

  संशयास्पद स्थितीत आढळला महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह
  श्री बाघम्बरी मठाच्या गादीवरून शिष्य आनंद गिरींसोबत सुरू होता वाद
  अन्य संत महंतांकडून करण्यात येत होते विवाद सोडवण्याचे प्रयत्न
  हा वाद सुरू असतानाच प्रयागराज इथं आढळून आला नरेंद्र गिरी यांचा मृतदेह
  श्री बाघम्बरी मठात महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळला
  सर्व दरवाजे बंद असलेल्या घरात आढळून आला महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह

 • 4:30 PM IST

  राज्यात सध्यातरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

  “मात्र, सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता”
  “लसीकरणाची गती वाढवली तर मोठ्या प्रमाणात संक्रमण टाळता येईल”
  जालन्यात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले स्पष्ट

 • 1:41 PM IST
  अखेर अटकेच्या भीतीनं अंधेरी कोर्टात हजर झाली कंगना राणावत
  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत अखेर सोमवारी अंधेरी कोर्टात हजर झाली
  अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशारा कोर्टानं कंगनाला दिला होता
  अंधेरी कोर्टानं मानहानी प्रकरणी पुढील सुनावणीस कंगना गैरहजर राहिली होती
  कंगनाला कोरोनाची चाचणी करता यावी, यासाठी मागितली होती मुभा
  परंतु जावेद अख्तर यांच्यातर्फे कंगनाच्या मागणीला करण्यात आला होता विरोध
 • 11:30 AM IST
  किरीट सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील – हसन मुश्रीफ

  किरीट सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील
  घोटाळा बाहेर काढू असं म्हणणाऱ्या किरीट सोमय्यांना मुश्रीफांचे प्रत्युत्तर
  सोमय्या कोल्हापूरात जाऊन मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल करणार होते
 • 10:29 AM IST
  किरीट सोमय्यांना पोलिसांनी कऱ्हाडमध्येच उतरवले

  किरीट सोमय्या कोल्हापूरला निघाले होते
  महालक्ष्मी एक्स्प्रेसद्वारे ते कोल्हापूरकडे जात होते
  कोल्हापूरात जाऊन ते हसन मुश्रीफांविरोधात पोलिसात तक्रार करणार होते
 • 8:13 AM IST
  भाजपचे नेते आणि माजी मंत्री रजिंदरपाल सिंग भाटिया यांची आत्महत्या

  रजिंदरपाल यांनी राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या
  रजिंदरपाल यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट
  ते खुज्जी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत
 • 7:52 AM IST
  भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर, महालक्ष्मी एक्स्प्रेसने झाले रवाना

  भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर
  महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसून गेले कोल्हापूरला
  सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन पकडली महालक्ष्मी एक्स्प्रेस
  कोल्हापूरात जाऊन सोमय्या हसन मुश्रीफांविरोधात पोलिसात तक्रार करणार आहेत