देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - OBC Reservation: राज्य सरकारला मोठा धक्का; ओबीसी आरक्षणासंदर्भातील अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती!

Also Read - 7th Pay Commission: खूशखबर! केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पुन्हा पगार वाढणार, जाणून घ्या Updates

Also Read - Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेकडून 8 उपनगरीय विशेष गाड्याची सोय!

Live Updates

 • 7:55 PM IST
  काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन, आतापर्यंत 11 दहशतवादी ठार
  8 ऑक्टोबरपासून घाटीमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये 9 चकमकी
  आतापर्यंत 11 दहशतवादी ठार, सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू
  काल रात्री पुलवामामध्ये झालल्या चकमकीत टीआरएफचा दहशतवादी शाहिद ठार
  तर श्रीनगरमधील बेमिना येथे दुसऱ्या चकमकीत आणखी एका दहशदवाद्यांचा खात्मा
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये अजून तीन दहशतवादी फरार
 • 5:51 PM IST
  पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, शरद पवारांचा केंद्राला इशारा
  एकदा देशानं इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत किंमत दिलीय, शरद पवारांचं वक्तव्य
  शेतकरी आंदोलनाबाबत भूमिकेवर भाष्य करताना पवारांचा मोदी सरकारला इशारा
  पंजाबमधील शेतकऱ्यांनी देशाच्या अन्न पुरवठ्यात सतत प्रचंड योगदान दिलंय : पवार
  देशाच्या संरक्षणातही ते पुढे असल्याचं माध्यमांशी बोलताना पवारांनी केलं नमूद
 • 3:31 PM IST
  उद्धव ठाकरे बायकोच्या नावाने घोटाळे करतात, किरीट सोमय्यांचा आरोप

  किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवार निशाणा
  मी ठाकरेंच्या विधानाशी एकदम सहमत आहे
  कोणीही खोटे आरोप करणे योग्य नाही
  पण जर उद्धव ठाकरे आपल्या बायकोच्या रश्मी उद्धव ठाकरेंच्या नावाने घोटाळा करत असतील तर साडेबारा कोटी जनता जाब विचारणार
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लुटमार करत आहेत
 • 3:29 PM IST
  आयकर विभागाच्या छापेमारीत पुण्यातील तब्बल 184 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

  गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु
  छापेमारीत तब्बल 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड
  मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील 70 ठिकाणी छापेमारी
 • 10:59 AM IST
  अफगाणिस्तान बॉम्बस्फोटाने हादरले, 33 जणांचा मृत्यू तर 74 जखमी

  अफगाणिस्तानात शिया मशिदीवर बॉम्बस्फोट
  कंदहारमध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटात 33 जणांचा मृत्यू तर 74 जखमी
  शिया मशिदीला केले जातेय टार्गेट
 • 10:49 AM IST
  केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची पदावरुन हकालपट्टी करा, शेतकरी आंदोलकांची मागणी

  लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरण
  केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची पदावरुन हकालपट्टी करा
  अन्यथा सोमवारी देशव्यापी रेल रोको करु
  शेतकरी आंदोलकांनी दिला इशारा
 • 7:55 AM IST
  दिलासादायक! राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय, मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर

  राज्यात 24 तासांत 1,898 रुग्णांनी कोरोनावर केली मात
  24 तासांत 2,149 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
  तर 24 तासांत 29 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  राज्यातील रिकव्हरी रेट 97.38 टक्क्यांवर
  तर राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर