Top Recommended Stories

live

Breaking News Live Updates: अबुधाबीमध्ये विमातळावर बंडखोरांचा ड्रोन हल्ला; दोन भारतीयांसह तीन जणांचा मृत्यू

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 17, 2022 6:56 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Breaking News Live Updates: अबुधाबीमध्ये विमातळावर बंडखोरांचा ड्रोन हल्ला; दोन भारतीयांसह तीन जणांचा मृत्यू
Drone attack on Abu Dhabi airport; Three killed, including two Indians

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

Live Updates

  • 6:53 PM IST

    अबुधाबीमध्ये विमातळावर बंडखोरांचा ड्रोन हल्ला; दोन भारतीयांसह तीन जणांचा मृत्यू

    येमेनच्या हुथी बंडखोरांचा संयुक्त अरब अमिरातीमध्ये पुन्हा एकदा मोठा हल्ला
    बंडखोरांनी मुसाफा भागात ड्रोन हल्ला केल्याची अबुधाबी पोलिसांनी दिली माहिती परिसरातील तीन ऑईल टँकरवर ड्रोन हल्ला, तेलाच्या टँकरमध्ये मोठा स्फोट
    पहिला हल्ला मुसाफा येथे तेल टँकरवर, तर दुसरा अबू धाबी विमानतळाच्या बांधकामाच्या ठिकाणी
    स्फोटाची आग अबुधाबी विमानतळापर्यंत पोहोचली, या हल्ल्यात तिघांचा मृत्यू
    दोन भारतीयांसह आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू, सहा जण जखमी

  • 4:50 PM IST
    नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ झळकणार

    प्रजासत्ताक दिन सोहळयात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नाही
    सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण
    महाराष्ट्राची जैवविविधता व मानके ही आहे चित्ररथाची संकल्पना
  • 3:24 PM IST
    पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली, 20 फेब्रुवारीला होणार मतदान होणार

    पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली
    14 फेब्रुवारी रोजी होणार होतो मतदान
    पण आता 20 फेब्रुवारीला होणार मतदान होणार
    केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला निर्णय
  • 1:31 PM IST
    आमदार नितेश राणे यांना हायकोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
    शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी राणेंवर गंभीर आरोप, जामीन फेटाळला
    नितेश राणे सुप्रीम कोर्टात आता आव्हान देणार, तोपर्यंत अटकेपासून संरक्षणाची मागणी
    नितेश राणेंसोबत गोट्या सावंत यांच्याही जामीन फेटाळल्याने दोघांवर अटकेची टांगती तलवार
    कणकवली सत्र न्यायालायने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर राणेंनी हायकोर्टात होतली होती धाव
  • 1:27 PM IST
    जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांच निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
    कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान झाले निधन
    ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसापासून सुरू होते उपचार
    ज्येष्ठ विचारवंत, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते अशी होती ओळख
    रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांशी लढणारे लढवय्ये नेते म्हणूनही होती ओळख
  • 12:14 PM IST
    12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चमध्ये होण्याची शक्यता

    बालकांचे लसीकरण लवकरच होणार
    12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चमध्ये होण्याची शक्यता
    मुलांना कोरोनाची लस देण्यास भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलने दिली मान्यता
  • 10:03 AM IST
    चिंताजनक! देशांत 24 तासांत 2,71,202 कोरोनाबाधितांची नोंद, 314 रुग्णांचा मृत्यू

    देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ
    देशात 24 तासांत 2,71,202 कोरोनाबाधितांची नोंद
    24 तासांत 314 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
    24 तासांत 39,646 रुग्णांची कोरोनावर मात
    देशात आतापर्यंत 4, 86,066 कोरोना रुग्णांची नोंद
  • 9:55 AM IST
    देशात ओमिक्रॉन रुग्णांमध्ये मोठी वाढ, रुग्णांची संख्या 7,743वर

    देशात ओमिक्रॉन रुग्णांमध्ये मोठी वाढ
    रविवारी 1,702 नवीन रुग्णांची नोंद
    शनिवारच्या तुलनेत रुग्णांमध्ये 28.17 टक्क्यांनी वाढ
    देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या 7,743वर

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 17, 2022 9:45 AM IST

Updated Date: January 17, 2022 6:56 PM IST