महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. कोकणामध्ये तर पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी, नाद्यांना महापूर आला आहे. चिपळून, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरामध्ये हजारो नागरिक अडकले असून एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे. पुढचे चार दिवस ही कोकणासाठी महत्वाचे आहेत कारण कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठ्या दुर्घटना घडला आहेत यात अनेकांचा बळी गेलाय. तर दुसरीकडे मुंबईसह उपनगरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी रुग्णसंख्या वाढत आहे. अशामध्ये राज्यात आणि देशात कोरोनाची नेमकी काय परिस्थिती आहे. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया…Also Read - Mumbai Corona Update: भायखळा तुरुंगातील सहा मुलांसह 39 महिला कैद्यांना कोरोनाची लागण, पालिकेकडून परिसर सील

Also Read - Gulabi cyclone: 'गुलाबी' चक्रीवादळाचा परिणाम, महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस!
Also Read - Breaking News Live Updates: राज्यात रविवारी दिवसभरात 3 हजार 292 रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट 97.24 टक्क्यांवर

Live Updates

 • 8:32 PM IST

  मुंबईतील वरळीत निर्माणाधीन इमारतीतील बांधकाम लिफ्ट कोसळल्याची घटना
  दुर्घटनेत चौघांचा मृत्यू, 7 पेक्षा अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
  मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे
  घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, बचावकार्य सुरु

 • 7:19 PM IST

  धोकादायक गावे तत्काळ ओळखून, त्यासाठीचे सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे
  कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये ‘रिस्क असेसमेंट‘ तातडीने करण्यात यावे
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारकडे मागणी

 • 7:18 PM IST

  “कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पाऊले टाकण्याची गरज”
  “अलमट्टीच्या विसर्गात नंतर अडथळे येतात, आत्ताच प्रयत्न करा, देवेंद्र फडणवीसांचा सरकारला सल्ला

 • 4:14 PM IST

  “टोक्यो ऑलंपिकची यापेक्षा सुखद सुरुवात होण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही.”
  “भारत उत्साही आहे. मीराबाईंची उत्तम कामगिरी”
  “वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन”
  “त्याचे यश प्रत्येक भारतीयांनी प्रेरणा देत आहे.”

 • 3:17 PM IST

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली दुर्घटनाग्रस्त तळीये गावाची पाहणी
  नागरिकांनी काळजी करू नये, सरकार सर्व मदत करेल – मुख्यमंत्री

 • 3:12 PM IST
  “नागरिकांनी काळजी करू नये, सरकार सर्व मदत करेल”
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं दुर्घटनाग्रस्त तळीये ग्रामस्तांना आश्वासन
  “धोकादायक, नुकसानग्रस्त वस्त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करू”
  “नागरिकांनी काळजी करू नये, सरकार सर्व मदत करेल”
  “ज्यांचं नुकसान झालं त्यांना पुर्ण नुकसान भरपायी मिळणार”
  सरकारच्या वतीने सर्वोतोपरी मदक केली जाईल, मुख्यमंत्र्याचे आश्वासन
 • 2:24 PM IST
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल
  दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवाद
  महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली
  तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली, आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू
 • 10:05 AM IST
  सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 50 फूटांवर, शहरातील अनेक भागात शिरले पाणी

  सांगलीत मुसळधार पावसाने कृष्णा नदीला पूर
  सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 50 फूटांवर
  शहरातील अनेक भागात शिरले पाणी
 • 10:03 AM IST
  कोल्हापूरकरांना दिलासा, पंचगंगा नदीची पाणी पातळी झाली कमी

  कोल्हापूरात मुसळधार पावसाने नद्यांना पूर
  पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती
  पण आता पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होऊ लगाली
  त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळालाय
 • 8:17 AM IST
  चिपळूनमध्ये पूर ओसरु लागला, पूरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त

  चिपळूनमध्ये पूर ओसरु लागला
  पूरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त
  एनडीआरएफकडून 1231 नागरिकांची सुटका
  बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
  चिपळूनमधील अनेक गावात पूरानंतर चिखलाचे साम्राज्य