राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यासह देशामध्ये कोरोनामुळे नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणार आहोत. देशासह राज्यामध्ये सध्या गणेशोत्सवाचे वातावरण आहे. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Breaking News Live Updates: गुलाब चक्रीवादळामुळे दोन मच्छिमारांचा मृत्यू

Also Read - Mumbai Corona Update: भायखळा तुरुंगातील सहा मुलांसह 39 महिला कैद्यांना कोरोनाची लागण, पालिकेकडून परिसर सील
Also Read - Gulabi cyclone: 'गुलाब' चक्रीवादळाचा परिणाम, महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस!

Live Updates

 • 4:14 PM IST
  गुड न्यूज! खाद्य तेलाच्या किमती होणार कमी, सरकारने पामतेलावरील आयात शुल्कात केली कपात

  खाद्य तेलाच्या किमती लवकरच होणार कमी
  सरकारने पामतेलावरील आयात शुल्कात केली कपात
  केंद्र सरकारच्या निर्णयाने सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
 • 3:27 PM IST
  गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा राजीनामा

  विजय रुपानी यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर दिला राजीनामा
  संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे मानले आभार
  यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार
 • 9:46 AM IST
  उत्तराखंड भूकंपाच्या धक्क्याने हादरले, भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल

  उत्तराखंड भूकंपाच्या धक्क्याने हादरले
  भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल
  भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर घेतली धाव
  जोशीमठपासून 31 किलोमीटर अंतरावर जाणवले भूकंपाचे धक्के
 • 9:35 AM IST
  अहमदाबादमधील ‘सरदारधाम भवन’चे PM मोदींच्या हस्ते आज होणार उद्घाटन

  अहमदाबादमधील सरदारधाम भवन’चे आज उद्घाटन
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करणार उद्घाटन
  सरदारधाम भवन फेज -2 मुलींच्या वस्तीगृहाचे देखील मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
 • 8:06 AM IST
  दिलासादायक! राज्यात कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढतेय

  राज्यात 24 तासांत 4154 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले
  तर 24 तासांत 4524 कोरोना रुग्ण बरे झाले
  तर 24 तासांत 44 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  राज्यात सक्रीय रुग्ण संख्या 49,812
  आतापर्यंत 1,38,061 रुग्णांचा मृत्यू
  तर आतापर्यंत 62,99,760 रुग्णांनी कोरोनावर केली मात
  तर आतापर्यंत 64,91,179 जणांना कोरोनाची लागण झालीये