देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - 11th Admission 2021: 11वीला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी विशेष संधी मिळणार!

Also Read - Health Department Exam: आरोग्य विभागाची परीक्षा कधी होणार?, आरोग्यमंत्र्यांनी सांगितली संभाव्य तारीख!
Also Read - Breaking News Live Updates: अत्याधुनिक शक्तिशाली आकाश प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; शत्रूला अचूक लक्ष्य करण्याची क्षमता

Live Updates

 • 7:02 PM IST

  “आज काही जणांनी नियम मोडून दहीहंडी साजरी केली, हे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही”

  नियम मोडून दहीहंडी साजरी करणाऱ्या मनसेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला
  “कोरोनाचे नियम नियम सरकारने का ठरवले? कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही”
  नियम मोडून दहिहंडी उत्सव साजरी करणाऱ्या मनसेला मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

 • 4:55 PM IST

  “हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात”

  “कोरोनाला अटकाव घालण्यासाठी नियम पाळावेच लागतील”
  राज ठाकरे यांच्या टिकनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
  “जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल”
  विरोधकांच्या टिकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली भूमिका

 • 1:24 PM IST
  भाजपचा घंटानाट! सुधीर मुनगंटीवारांसह 30 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल
  भाजपचं मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातील घंटानाद आंदोलन
  भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 30 कार्यकर्त्यांवर गावदेवी पोलिसांत गुन्हा दाखल
  नाशिकमधील रामकुंडावरील शंखनाद आंदोलन
  भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवेंविरुद्ध पंचवटी पोलिसांत गुन्हा
  तुषार भोसले, सीमा हिरेंच्या विरोधात गुन्हा
 • 9:42 AM IST
  अमेरिकन सैन्याची 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानातून घरवापसी; काबूलमधून शेवटच्या विमानाचे उड्डाण
  अमेरिकन सैन्याची 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानातून घरवापसी
  काबूलमधून अमेरिकेच्या विमानाचं 30 ऑगस्टला शेवटचं उड्डाण
  तालिबाननं अमेरिकेला अफगाणिस्तान सोडण्याची 31 ऑगस्ट दिली होती डेडलाईन
  अमेरिकेनं काबूल विमानतळ सोडण्याचे सैन्याला फर्मान
  अमेरिकेनं एक दिवस आधीच सोडला काबूल विमानतळ
  काबूलच्या हमिद करझई विमानतळावरून शेवटच्या विमानाचं अमेरिकेकडे उड्डाण
 • 9:32 AM IST
  औरंगाबाद- कन्नड घाटात दरड कोसळली,धुळे-सोलापूर महामार्ग ठप्प
  मुसळधार पावसात कन्नड घाटात दरड कोसळली
  दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान
  सुदैवानं कोणतीही जिवीतहानी नाही.
  तितुर व डोंगरी नदीला महापूर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
  चाळीसगाव शहरातील विविध भागात पुराचं पाणी शिरलं
  प्रसिद्ध पीर मुसा कादरी बाबांच्या दर्गात पाणी शिरलं
  औरंगाबाद कन्नड तालुक्यातील नागद गावातील गडदगड नदीला मोठा पूर
 • 8:17 AM IST
  मुंबई शहरात असल्फा भागात दरड कोसळल्यानं 5 ते 6 घरांचं मोठं नुकसान
  या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी
  घरांवर दरड कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, पालिका अधिकारी आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल
  ढिगारा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढलं.
  सोमवारी रात्री उशिरा अचानक डोंगराचा काही भाग असल्फा भागात बांधलेल्या घरांवर पडला