राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यासह देशामध्ये कोरोनामुळे नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणार आहोत. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Gulab Cyclone: महाराष्ट्रात अलर्ट! वादळीवाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा

Also Read - Breaking News Live: काँग्रेस हायकमांडने नाही स्विकारला सिद्धू यांचा राजीनामा! प्रदेश काँग्रेसला दिले हे निर्देश
Also Read - Sukanya Samriddhi Yojana: फक्त 8 ते 10 रुपये गुंतवणूक करून उज्ज्वल करा मुलीचं भविष्य

Live Updates

 • 6:45 PM IST
  मी दिलेला शब्द हा पाळला, राजू शेट्टींच्या उमेदवारीवरून शरद पवारांची प्रतिक्रिया
  राजू शेट्टींनी करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
  पवारांनी विधान परिषदेचा शब्द दिला होता म्हणत राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी
 • 12:58 PM IST
  भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही, आमदार मंदा म्हात्रेंकडून पक्षाला घरचा आहेर

  भाजपामध्ये महिलांचा सन्मान होत नाही
  आमदार मंदा म्हात्रे यांचा पक्षाला घरचा आहेर
  स्वपक्षाकडून महिलांना डावलले जाते
  मंदा म्हात्रे यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण
 • 12:54 PM IST
  बोरीवलीमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी

  बोरीवलीमध्ये इमारतीला भीषण आग
  गांजावाला लेनवरील रहिवासी इमारतीला आग
  सातव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती
  अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी
  आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु
 • 10:59 AM IST
  भोसरी जमीन घोटाळा प्रकरण, एकनाथ खडसेंविरोधात ईडीने दाखल केले आरोपपत्र

  भोसरी जमीन घोटाळा प्रकरण
  एकनाथ खडसेंविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल
  खडसेंच्या पत्नी आणि जावई गिरीश चौधरीविरोधातही आरोपपत्र दाखल
  या सर्वांवर मनी लाँड्रींगचा आरोप लावण्यात आलाय
  खडसेंच्या जावयाचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला
 • 10:54 AM IST
  टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला मिळाली दोन पदकं

  टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज मनीष नरवालने पटकावले सुवर्ण पदक
  नेमबाज सिंहराज अधानाने पटकावले रौप्य पदक
 • 7:29 AM IST
  दिलासादायक! राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त

  राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त
  गेल्या 24 तासांत 4,360 रुग्णांची कोरोनावर मात
  राज्यात रिकव्हरी रेट 97.04 टक्क्यांवर
  तर गेल्या 24 तासांत 4,313 नव्या रुग्णांची नोंद
  तर 92 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू