Top Recommended Stories

live

Breaking News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं अनावरण

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 23, 2022 8:46 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Breaking News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं अनावरण
prime minister narendra modi unveils hologram statue of netaji subhas chandra bose at india gate

Live Updates

 • 8:43 PM IST

  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं अनावरण

  इंडिया गेट सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त होलोग्राम पुतळ्याचे अनावरण
  हा पुतळा सुभाषचंद्र बोस यांच्या कृतज्ञतेचे प्रतीक, पंतप्रधान मोदींनी केली होती घोषणा

 • 6:54 PM IST

  केपटाऊनमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय सामना सुरू

  सुरुवातील फलंदाजी करून आफ्रिकेने टीम इंडियासमोर ठेवले 288 धावांचं आव्हान
  आफ्रिकेच्या 49.5 षटकात सर्वबाद 288 धावा, सलामवीर क्विंटन डी कॉकचं शानदार शतक
  क्विंटन डी कॉकची 130 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसंह 130 धावांची खेळी
  टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या
  जसप्रीत बुमराह आणि दीपक चाहर जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या

 • 4:24 PM IST
  राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही – आदित्य ठाकरे

  राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार
  पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही
  सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे
  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मत
 • 3:46 PM IST
  पाकिस्तानातील धुळीचे वादळ महाराष्ट्रात धडकले

  पाकिस्तानातून सुटलेले वादळ गुजरातमार्गे महाराष्ट्रात धडकले
  अरबी समुद्रामार्गे वादळ महाराष्ट्रात धडकले
  कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रत थंड वारे सुरु
  उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली
 • 3:35 PM IST
  कुर्ल्यात दरड घरावर कोसळली, एका महिलेचा मृत्यू

  कुर्ल्यात दरड घरावर कोसळली
  कुर्ल्याच्या आंबेडकर नगर येथील घटना
  गरीब मोहल्लामधील घरावर दरड कोसळली
  लता साळुंखे या महिलेचा मृत्यू
 • 9:28 AM IST
  इंडिया गेटवर आज उभारण्यात येणार सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्राम पुतळा

  नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज 125 वी जयंती
  इंडिया गेटवर आज उभारण्यात येणार सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्राम पुतळा
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे होणार उद्घाटन
 • 8:03 AM IST
  मुंबईत 24 तासांत 3,568 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

  मुंबईत 24 तासांत 3,568 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
  मुंबईत 24 तासांत 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या 17,497 वर
  तर 231 रुग्णांनी केली कोरोनावर मात
 • 8:03 AM IST
  देशात ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 10 हजारांवर, तर 488 कोरोना रुग्णांचा मृत्यू

  देशात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढतेय
  ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 10 हजारांपेक्षा जास्त
  तर देशात कोरोनाचे 3,37,000 नवे रुग्ण आढळले
  तर 24 तासांत 488 कोरोना रुग्णांचा मृत्यू
 • 8:03 AM IST
  राज्यात ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 2,759 वर

  राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढतेय
  राज्यात 24 तासांत 416 नव्या रुग्णांची नोंद
  तर 2,759 रुग्णांनी ओमिक्रॉनवर केली मात
 • 7:55 AM IST
  राज्यात 24 तासांत 46,393 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

  राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरु झालीये
  राज्यात 24 तासांत 46,393 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
  24 तासांत 48 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  तर 30,795 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  राज्यातील मृत्यूदर 1.91 टक्के झाला

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 23, 2022 7:44 AM IST

Updated Date: January 23, 2022 8:46 PM IST