Breaking News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड पार्टीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…
Also Read:
Live Updates
-
गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड पार्टीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
पहिल्या यादीत फातोर्डा आणि मायेम या दोन मतदारसंघासाठी उमेदवारांची नावे जाहीर
फातोर्डामधून विजय सरदेसाई यांना, तर मायेमसाठी संतोषकुमार सावंत यांना उमेदवारी| -
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर
राजनाथ सिंह यांनी स्वत: ट्वीट करून दिली याबाबत माहिती
सौम्य लक्षणांसह कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, होम क्वारंटाईनमध्ये उपचार सुरू
संपर्कात आलेल्यांना स्वत:चे विलगीकरण आणि टेस्ट करून घेण्याचे आवाहनI have tested positive for Corona today with mild symptoms. I am under home quarantine. I request everyone who have recently come in my contact to isolate themselves and get tested.
— Rajnath Singh (@rajnathsingh) January 10, 2022
-
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी प्रकरण: निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करणार
– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात येणारचंदीगडचे डीजीपी, उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल आणि आणखी एक अधिकारी असणार आहेत.– समितीतत NIA-IB अधिकाऱ्यांचाही समावेश– पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाभंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली -
गारठा आणखी वाढणार… विदर्भ-मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अलर्ट
– राज्यात सध्या वातावरणात खूप मोठे बदल होत आहेत– काही जिल्ह्यात अजूनही अवकाळी पाऊस सुरूच– हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अलर्ट– उत्तरेकडील पश्चिम विक्षोभ,अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता व पुढील 4 ते 5 दिवस अरबी आणि बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे याचा परिणाम 9 ते 13 जानेवारी दरम्यान दिसरणार– भारतात काही राज्यांमध्ये मध्यम आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता– महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज– काही भागांत गारपिटीचीही शक्यता, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन– परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या भागांमध्ये अवकाळी पावसाचा अलर्ट -
गोव्यात भाजपला मोठा धक्का; मायकल लोबो यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
– गोव्यासह उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड, मणिपूर पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर– गोव्यातील भाजपचे कळंगुटमधील आमदार आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी राजीनामा– मायकल लोबो यांनी सोमवारी सकाळी आपला मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला– लोबो यांनी विधानसभा अध्यक्षांना आमदारकीचाही राजीनामा दिला– गोव्यात भाजप मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेताना मला दिसत नाही- मायकल लोबो– मायकल लोबो आता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती– वर्षभरापासून मायकल लोबो यांनी भाजप सरकारवर होते नाराज -
मुंबई पोलिस दलातील 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण– मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव– 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण,– सहपोलिस आयुक्तांसह 4 अप्पर पोलिस आयुक्त आणि 13 पोलिस उपायुक्तांना कोरोनाचा संसर्ग
-
अपार्टमेंटमध्ये भीषण आग, 9 मुलांसह 19 जणांचा मृत्यू, 62 जखमी
– अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या ब्रॉन्क्समध्ये अपार्टमेंटचा भीषण आग
– आगीत 19 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 9 मुलांचा समावेश, 62 जखमी– 32 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत– अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आगीवर मिळवले नियंत्रण– आग कोणत्या कारणामुळे लागली, याचा तपास सुरू– ही घटना न्यूयॉर्कमधील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक मानली जातेय
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या