गुलाब चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरश: कहर केला आहे. या पावसामुळे बळीराजाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यासह देशामध्ये कोरोनामुळे नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणार आहोत. देशासह राज्यामध्ये सध्या गणेशोत्सवाचे वातावरण आहे. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Cruise Drugs Party Case: 'जेलमधून बाहेर आल्यावर वाईट काम करणार नाही', आर्यन खानचे समीर वानखेडेंना वचन!

Also Read - Breaking News Live Updates: जम्मू-काश्मीर पोलिसांकडून अलर्ट जारी, गैर काश्मीरी मजुरांना सुरक्षा छावणीत हलवण्याच्या सूचना
Also Read - Breaking News Live Updates: पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, शरद पवारांचा केंद्राला इशारा

Live Updates

 • 8:10 PM IST
  विश्वास नांगरे पाटील यांची निष्ठा भ्रष्टाचारी मंत्र्यांशी, किरीट सोमय्या यांचा थेट आरोप
  भाजप नेते किरीट सोमय्या यांची महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरूच
  आता किरीट सोमय्या यांनी सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांवर केले थेट आरोप
  विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या अधिकाराचा वापर भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यासाठी केला
  किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे राज्यभरात खळबळ
  विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल करणार
  कोल्हापूर दौऱ्यावर जात असताना पोलिसांनी 6 तास घरात कोंडून ठेवलं
  पोलिस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी संपर्कात होते
 • 3:12 PM IST
  अभिनेत्री दिया मिर्झाला मिळाला ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ अवॉर्ड

  बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाला मिळाला ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ अवॉर्ड
  पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीसाठी दियाला मिळाला हा पुरस्कार
  30 सप्टेंबरला मुंबईतील ताज महाल हॉटेलमध्ये आयोजित सोहळ्यात दियाला पुरस्काराने केले सन्मानित
  महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते दियाला पुरस्कार प्रदान
 • 1:46 PM IST
  आरे कॉलनीमध्ये दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर जेरबंद

  आरे कॉलनीमध्ये गेल्या महिनाभरापासून बिबट्या धुमाकूळ घालत होता
  या बिबट्याला अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले
  आज पाहटे तीनच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला
  या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले
  त्याठिकाणी त्याची वैद्यकीय तपासणी होणार
 • 1:24 PM IST
  मध्य प्रदेशमध्ये बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

  मध्य प्रदेशमध्ये बस आणि कंटेनरचा भीषण अपघात
  भिंड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला
  अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू तर 13 जण जखमी
 • 12:48 PM IST
  67 वर्षांनंतर एअर इंडियावर पुन्हा टाटा समूहाची मालकी

  एअर इंडियाच्या मालकीच्या मुद्द्यावर पडला पडदा
  67 वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे
  एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अखेर संपुष्टात
 • 11:39 AM IST
  जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा

  जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
  एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश
  घटनास्थळावर जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु
 • 7:34 AM IST
  दिलासादायक ! राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्क्यांवर

  राज्यात 24 तासांत 3,198 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  24 तासांत 3,063 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
  तर दिवसभरामध्ये 56 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर
  तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्क्यांवर