live

Breaking News Live Updates: मोठा दिलासा! राज्यात आज एकही ओमिक्रॉन रुग्ण आढळला नाही, पण...

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 7, 2022 10:11 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

COVID19, COVID Cases in Maharashtra, Maharashtra, corona, coronavirus, omicron, University, college, online classes,
Representative Image

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

Live Updates

 • 10:09 PM IST
  मोठा दिलासा! राज्यात आज एकही ओमिक्रॉन रुग्ण आढळला नाही, पण…

  – कोरोनाचा रुग्णसंख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला काहीशी दिलासादायक बातमी
  – राज्यात आज एकही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही.
  – राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी मोठी वाढ झाली
  – राज्यात 40 हजार 925 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झाले
  – गुरुवारच्या तुलनेत राज्यात साडे चार हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले
  – गुरुवारी राज्यात 36 हजार 265 कोरोना पॉझिटिव्ह आढळले होतेठ
  – कोरोनामुळे दिवसभरात एकूण 20 रुग्ण दगावले
  – राज्याचा मृत्यू दर हा 2.07 टक्के इतका आहे
 • 8:17 PM IST
  नागपुरात खळबळ! RSS चे मुख्यालय दहशतवाद्यांच्या रडारवर, सुरक्षेत वाढ

  – नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय दहशतवाद्यांच्या रडारवर
  – जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून रेकी करण्यात आल्याची माहिती समोर
  – या या घटनेमुळे नागपूरसह देशात खळबळ, संघ मुख्यालयाबाहेर सुरक्षा वाढवली
  – नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली रेकी झाल्याची माहिती
  – याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु
 • 5:14 PM IST
  मुंबईत दोन तासांत 93 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

  मुंबई पोलिस कोरोनाच्या विळख्यात
  पोलिस कर्मचाऱ्यांना होतेय कोरोनाची लागण
  गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली
  यावेळी चार कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला
  मुंबईत इतर ठिकाणी देखील पोलिसांना कोरोना झालाय
 • 4:24 PM IST
  छगन भुजबळ यांच्या कार्यालयाला कोरोनाचा विळखा, 22 जणांना कोरोनाची लागण

  छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील 22 जणांना कोरोनाची लागण
  यापूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरना लागण झाली
  दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील 21 कर्मचारी कोरोनाबाधित
 • 4:21 PM IST
  BCCI च्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; पुढील काही दिवस मुख्यालय बंद
  – मुंबईतील बीसीसीआय कार्यालयातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
  – बीसीसीआय मुख्यालयात तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर
  – यानंतर तीन दिवस कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय
  – अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सेल्फ क्वारंटाईन होण्याच्या सूचना
 • 2:14 PM IST
  TET परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे यांना कोरोनाची लागण

  – पुण्यात तुकाराम सुपे अटकेत असून त्यांच्यासह 11 जणांना कोरोनाची लागण झाली
  – शिव कुमार, अश्विन कुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिघोट आणि डीसीपी भाग्यश्री नवटक्के कोरोनाबाधित
 • 10:44 AM IST
  चिंताजनक! 26 राज्यांमध्ये 3000पेक्षा अधिक ओमायक्रॉनबाधितांची नोंद

  भारताला ओमायक्रॉनचा विळखा वाढत चाललाय
  26 राज्यांमध्ये 3000पेक्षा अधिक ओमायक्रॉनबाधितांची नोंद
  महाराष्ट्रात आतापर्यंत 876 रुग्णांची नोंद
  दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे 465 रुग्णांची नोंद
 • 10:40 AM IST
  शेअर बाजारात अच्छे दिन, सेन्सेक्सने 60 हजाराचा टप्पा ओलांडला

  शेअर बाजारात अच्छे दिन
  सेन्सेक्सने 60 हजाराचा टप्पा ओलांडला
  निफ्टीनेदेखील 17800 चा टप्पा ओलांडला
 • 10:37 AM IST
  गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या 4 स्टाफ मेंबर्स कोरोना पॉझिटिव्ह

  राज्याचे गहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या 4 स्टाफ मेंबर्सला कोरोनाची लागण
  गहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालयाने दिली माहिती
  मंत्र्यांच्या निवासस्थानी राहणाऱ्या लोकांची देखील कोरोना चाचणी केली
 • 10:25 AM IST
  देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार, आज तारीख जाहीर होण्याची शक्यता

  उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या ५ राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका
  निवडणुकांबाबत आज सकाळी ११ वाजता निवडणूक आयोगाची होणार बैठक
  बैठकीमध्ये निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या जाण्याची शक्यता

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 7, 2022 7:39 AM IST

Updated Date: January 7, 2022 10:11 PM IST