महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूचा वेगाने प्रसार होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. याबाबत दोन दिवसात नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे 21 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि जनतेच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने 21 दिवसात निर्णय घेतला नाही तर पुढची दिशा ठरवावी लागेल, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया…Also Read - IND vs ENG : टीम इंडियाला धक्का, रोहित शर्मा कसोटीतून बाहेर, जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद

Also Read - COVID-19 Vaccine : मोठा निर्णय! आता कोणत्याही वयोगटातील नागरिकांना मिळणार लस, देशातील पहिल्या m-RNA लसला मंजुरी

Also Read - Rohit Sharma Daughter Video : रोहित शर्माच्या मुलीने बोबडे बोलत दिली वडिलांच्या तब्बेतीची अपडेट, व्हिडिओ झाला व्हायरल

Live Updates

 • 4:03 PM IST
  राज्यात डेल्टा प्लस विषाणूने एकाचा मृत्यू
  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
  रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील घटना
  80 वर्षांच्या वृद्ध महिलेचा झाला मृत्यू
  या महिलेला डेल्टा प्लस विषाणूची झाली होती लागण
  त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते
  मृत महिलेला इतरही आजार होते
 • 12:52 PM IST
  मुंबईच्या फोर्ट परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळला
  घटनास्थळावर अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल
  40 जणांना सुखरुप वाचवण्यात यश
  कोणतीही जीवीतहानी झाली नाही

 • 11:08 AM IST
  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपूरातील घरावर ईडीचा छापा
  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरातील घरावर ईडीचा छापा
  सकाळपासून अनिल देशमुखांच्या घराची झाडाझडती सुरु
  अनिल देशमुख नागपूरमध्ये नाहीत
  देशमुखांवर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केले होते आरोप
  अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप
  याप्रकरणी अनिल देशमुखांनी दिला होता गृहमंत्री पदाचा राजीनामा
 • 10:55 AM IST
  राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत 9,844 नव्या रुग्णांची नोंद

  राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
  24 तासांत 9,844 नव्या रुग्णांची नोंद
  तर, 24 तासांत 197 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा पोहचला 60 लाखांवर
  तर आतापर्यंत 1,19,859 रुग्णांचा मृत्यू
 • 9:33 AM IST
  पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात; सामनाच्या अग्रलेखातून टीका

  पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात
  गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवणं हे संतापजनक
  मन हेलावून टाकणारा प्रकार
  बुलडोझर फिरवून लोकांना रस्त्यावर आणणे हे अमानुष तसंच निर्घृण
  सामनाच्या अग्रलेखातून पुणे पालिका सत्ताधाऱ्यांवर टीका
 • 8:48 AM IST
  तॉक्ते चक्रीवादळात बुडालेल्या वरप्रदा टगबोट कंपनीविरोधात कारवाई
  मुंबईच्या येलो गेट पोलिसांनी कंपनी आणि मालकाविरोधात गुन्हा केला दाखल
  वरप्रदा टगची कंपनी ग्लोरी शिपमॅनेजमेंट प्रा लि आणि मालक राजेंद्र साहीविरोधात गुन्हा
 • 8:44 AM IST
  औरंगाबादमध्ये शिवसंग्राम-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा
  शिवसैनिकांनी आमदार विनायक मेटेंना शिविगाळ करत भाषण बंद पाडले
  बैठकीच्या संयोजकांना केली मारहाण
  याप्रकरणी शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल
  छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
 • 8:34 AM IST
  जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होणार
  पंतप्रधान मोदींसोबत जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची झाली बैठक
  पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत झाला निर्णय
  डी लिमिटेशननंतर काश्मीरमध्ये होणार निवडणूक