राज्यात नवरात्रोत्सवानिमित्त आनंद पाहायला मिळत आहे. पण कोरोना नियमांचे पालन करुन नवरात्रोत्सव साजारा केला जात आहे. देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Diwali Guidelines : दिवाळीसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी; गर्दी, फटाके टाळण्याचं आवाहन

Also Read - Photo of a Sweet Couple: नवाब मलिकांचा आणखी एक बॉम्ब, समीर वानखेडेंच्या 'निकाह'चा फोटो केला शेअर
Also Read - Mumbai Local Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

Live Updates

 • 10:50 PM IST
  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक
  सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक व सुटका
  आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानं अनंत करमुसे यांनी केली होती बेदम मारहाण
  जितेंद्र आव्हाड वर्तकनगर पोलिस स्टेशनला गेले आणि त्यांनी स्वत:ला पोलिसांच्या हवाले करून घेतलं
  जितेंद्र आव्हाड यांना ठाणे कोर्टानं 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला

  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली माहिती


 • 7:42 PM IST
  वरुण गांधींचा भाजपला घरचा आहेर! अटल बिहारी वाजपेयींचा व्हिडिओ केला शेअर

  भाजप खासदार वरुण गांधी यांचा पुन्हा एकदा पक्षाविरोधात आवाज
  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जुन्या व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांना दिला पाठिंबा
  वरुण गांधी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या 1980 च्या भाषणाची क्लिप केली ट्वीट

  कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने वरुण गांधी यांनी पक्षाला दिला अनेकदा सल्ला


 • 7:27 PM IST
  …तर पाकिस्तानात घुसून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करणार; अमित शहांचा पाकिस्तानला इशारा

  …तर पाकिस्तानात घुसून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करणार
  केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पाकिस्तानला सज्जड इशारा
  पाकिस्तानमधून होणारी घुसखोरी सुरूच
  काश्मीरमधील सामान्य नागरिकांवर हल्ले होत राहिले तर प्रत्युत्तर देणार
  मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्री असताना पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता
  भारताच्या सीमाभागात छेडछाडी करणं पाकिस्तानला महागात पडणार
 • 6:11 PM IST
  दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आमदारांना मोठं गिफ्ट! आता 4 कोटींचा विकास निधी मिळणार

  आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ
  उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री अजित पवारांनी पाळला शब्द
  आमदारांचा स्थानिक विकास निधीत वाढ करण्याच अजित पवार यांनी सभागृहात दिला होता शब्द
  अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याबद्दल सत्ताधाऱ्यांसह विरोधी आमदारांच्यात सुद्धा आनंदाचे वातावरण
  विधानसभेतील 288 आणि विधान परिषदेतील 62 अशा एकूण 350 आमदारांना अतिरिक्त निधी उपलब्ध होणार
  सर्व आमदारांना आता प्रत्येकवर्षी एकूण 1400 कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी मिळणार
 • 3:56 PM IST
  शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना हायकोर्टाचा दणका

  ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका कोर्टाने फेटाळली
  अडसुळांना सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
 • 12:14 PM IST
  अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसला ईडीचा समन्स

  तिहार कारागृहातून 200 कोटी रुपयांच्या वसुलीचे रॅकेट प्रकरण
  अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसला ईडीचा समन्स
  नोरा फतेहीला ईडीने आज चौकशीसाठी बोलावले आहे
  तर ईडीने जॅकलिन फर्नांडिस यांना साक्षीदार म्हणून बोलावले
  काही दिवसांपूर्वी याप्रकरणी जॅकलिनचा जबाब नोंदवला होता
 • 12:06 PM IST
  क्रुझ ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावीविरोधात लुकआऊट नोटीस जारी

  पुणे पोलिसांकडून किरण गोसावीविरोधात लुकआऊट नोटीस जारी
  2018 मध्ये फरासखाना पोलिस ठाण्यामध्ये फसवणूक प्रकरणी किरणविरोधात गुन्हा
  फसवणूक प्रकरणात फरार असलेल्या किरणविरोधात लुकआऊट नोटीस जारी
 • 11:57 AM IST
  दिलासादायक! देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय, रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर

  देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय
  रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर
  24 तासांत 18,987 नव्या रुग्णांची नोंद
  24 तासांत 246 रुग्णांचा मृत्यू
 • 8:20 AM IST
  क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरण, आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

  क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरण
  आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा होणार सुनावणी
  बुधवारी जामीन अर्जावर सुनावणी झाली पण कोर्टाने निर्णय आजवर ढकलला
  एनसीबीचा आर्यन खानच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध