देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - BKC Flyover Collapsed: बीकेसी पूल दुर्घटना प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार: एकनाथ शिंदे

Also Read - Shiv sena- Bjp Alliance: मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Also Read - Pornography Case: शिल्पा शेट्टीनं पोलिसांना सांगितली 'राज की बात', कुंद्राच्या अडचणीत वाढ?

Live Updates

 • 5:16 PM IST
  राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर
  राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आजी माजी आमदारांनी मांडल्या तक्रारी
  शिवसेना व काँग्रेस मतदारसंघातील काम करत नसल्याची तक्रारी
  राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर दिली माहिती
  “जिथे जिथे एक पक्षाचं सरकार आहे. त्या ठिकाणी सुद्धा आमदारांचे मतभेद असतात”
  “प्रत्येक आमदाराला, नेत्यांना आपल्या मतदारसंघातील कामं जास्त व्हावेत असं वाटतं”
  “हा काही मोठा प्रश्न आहे असं आम्ही मानत नाही” नवाब मलिकांनी दिलं स्पष्टीकरण
 • 2:02 PM IST
  माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ
  अँटिलिया प्रकरणाला लागलं वेगळं वळण
  5 लाख रुपयांची लाच दिल्याचा सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवला
  मुंबई पोलिस दलातील बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्याविरोधात एनआयएनं दाखल केलं चार्जशीट
  सचिन वाझे याच्यासह 10 जणांवर आरोपपत्र दाखल
  अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवण्यामागे काय हेतू होता? याचा एएनआयकडून खुलासा
  परमबीरसिंह यांनी अहवालात बदल करण्यास सांगितले होते
  अँटिलिया बॉम्ब प्रकरणी मुंबई पोलिसांसोबत काम केलेल्या एका सायबर तज्ज्ञांचा दावा
  या प्रकरणात जैश-उल-हिंदचे पोस्टर जोडणं आवश्यक असल्याचे म्हणत परमबीरसिंह यांनी या कामासाठी पाच लाख रुपये देण्याचं दिलं होतं वचन
 • 11:21 AM IST
  अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक, आईसाठी लिहिली भावनिक पोस्ट

  बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक
  अक्षय कुमारची आई अरूणा भाटीया यांचं निधन
  गेल्या काही दिवसांपासून आईची प्रकृती होती चिंताजनक
  आईच्या निधनाची बातमी अक्षयनं सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली
  अक्षयनं आईसाठी लिहिली भावनिक पोस्ट

  https://www.instagram.com/p/CTi9v8ToZ-d/

 • 9:22 AM IST
  नाशिकच्या माजी महापौर पुत्राविरोधात गुन्हा दाखल
  मनसे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे चिरंजिव विजय मुर्तडकांवर गुन्हा
  विजय मुर्तडकांवर एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा आरोप
  पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू
 • 7:59 AM IST
  मुंबईत कोरोनाव्हायरसची तिसरी लाट आली असून आता लोकांनी अधिकची खबरदारी घेण्याची गरज
  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची महत्त्वपूर्ण घोषणा
  मुंबईकरांनी लोकांनी गणेशोत्सव घरीच साजरा करावा, नागरिकांना आवाहन
  ऑगस्टच्या तुलनेत 28 टक्क्यांची रुग्णवाढ
  महापौरांचं शहरातल्या कोरोनास्थितीवर भाष्य
  गणेशोत्सव साजरा करताना गर्दी करु नका
  पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडॉऊनमध्ये मुंबईत मोठ्या संख्येत कोरोना रूग्ण सापडले होते.
  मुंबई हा महाराष्ट्राचा हॉटस्पॉट ठरला होता