देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Omicron Varient: दक्षिण अफ्रिकेसह इतर देशातून मुंबईत 2,868 प्रवासी दाखल, 9 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह!

Also Read - Breaking News Live Updates: 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज होणार उद्घाटन

Also Read - Omicron Restriction: महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना 'हे' नियम पाळावेच लागतील, अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Live Updates

 • 6:38 PM IST
  मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण,आई देखील कोरोनाबाधित
  बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून याबाबतची पुष्टी, दोघांवर घरीच उपचार सुरू
  राज यांची काही दिवसांपासून प्रकृती स्थिर नव्हती, टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह
  राज ठाकरे आणि त्यांच्या आई दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणं
  राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने मनसेच्या अनेक बैठका, मेळावे स्थगित
 • 4:24 PM IST
  आमचं सरकार पूर्ण 5 वर्षे चालणार – संजय राऊत

  सरकार पडणार असं म्हणणाऱ्यांना संजय राऊत यांचं उत्तर
  आमचं सरकार फोडू शकत नाही
  देशात उद्धव ठाकरेंचं सरकार उत्तम चालणार
  कितीही फडफड केली तरी त्यांचे पंख झडतील
  नवाब मलिकांनी जी माहिती समोर आणली
  मलिकांच्या माहितीचे सोर्स योग्य असतील
  दूध का दूध, पाणी का पाणी लवकरच होईल
 • 4:05 PM IST
  मुंबईत 3 ठिकाणी एनसीबीची छापेमारी

  मुंबईमध्ये एनसीबीकडून छापेमारी सुरु
  मुंबईत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी
  वांद्रे भागात वेगवेगळ्या ठिकाणी धाडसत्र
 • 4:00 PM IST
  क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरण, अनन्या पांडेची सोमवारी पुन्हा होणार चौकशी

  अनन्या पांडेला एनसीबीने सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले
  एनसीबी सोमवारी अनन्या पांडेला संशयास्पद आर्थिक व्यवहार, आरोपींचे स्टेटमेंट आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे याबाबत चौकशी करणार
  सोमवारी सकाळी 11 वाजता अनन्याची पुन्हा चौकशी होणार
 • 8:16 AM IST
  राज ठाकरे यांचा पुणे दौरा अचानक रद्द, आजारी असल्यामुळे घेतला निर्णय

  राज ठाकरे यांचा पुणे दौरा अचानक रद्द
  राज ठाकरे आजारी असल्यामुळे दौरा केला रद्द
  पुण्यामध्ये मनसे शाखाध्यक्षांचा होणार होता मेळावा
  राज ठाकरे पक्षाध्यक्षांना संबोधित करणार असल्यामुळे होती उत्सुकता
  सोशल मीडियाच्या माध्यमातून दौरा रद्द केल्याचे केले जाहीर
 • 7:27 AM IST
  राज्यात 24 तासांत 1,744 रुग्णांची कोरोनावर मात, तर 40 जणांचा मृत्यू

  राज्यात कोरोनाची लाट ओसरतेय
  राज्यात 24 तासांत कोरोनाचे 1,632 रुग्ण आढळले
  24 तासांत 1,744 रुग्णांची कोरोनावर मात
  तर 40 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाज
  राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्क्यांवर