live

Breaking News Live Updates: नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ, पालकमंत्री छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय

देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Updated: January 6, 2022 6:11 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Breaking News Live Updates: नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ, पालकमंत्री छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय
Chhagan Bhujbal File Photo

देशासह राज्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहेत. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…

Also Read:

Live Updates

 • 6:04 PM IST
  नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ, पालकमंत्री छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय

  – नाशिक शहरासह जिल्ह्यात 28 डिसेंबरपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ
  – नाशिकमध्ये 10 वी आणि 12 वीचे वर्ग वगळून सर्व शाळा बंद
  – विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळणार
  -पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला मोठा निर्णय
  – नाशिक शहरात दोन्ही डोस घेतल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेशास परवानगी
  – कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले नसतील तर सरकारतर्फे दिले जाणारे रेशन नाही मिळणार
 • 4:39 PM IST
  इटलीहून अमृतसरला आलेल्या विमानात 179 पैकी 125 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह

  – राजासांसी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून आलेल्या फ्लाइटमधील 125 प्रवाशांना कोरोना पॉझिटिव्ह आढळले
  – अमृतसर विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी दिली माहिती
  – प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर विमानतळावर आलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांनी एकच गोंधळ केला
  -रोम, इटली येथून विमानात चढत असताना त्यांची चाचणी करण्यात आली
  – चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली होती.
  -पण गुरुवारी अमृतसर विमानतळावर प्रवाशी उतरल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली, अहवाल पॉझिटिव्ह आला.
 • 4:26 PM IST
  राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
  – बीड जिल्ह्यातील परळी कोर्टाने जारी केला राज ठाकरेंविरुद्ध अटक वॉरंट
  – सन 2008 मधील प्रकरणामध्ये कोर्टाने दिले आदेश
  – राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केल्याप्रकरणी वॉरंट जारी
 • 12:29 PM IST
  देशात कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, 24 तासांत 90,928 रुग्णांची नोंद

  देशात कोरोना रुग्णसंख्येत होतेय वाढ
  24 तासांत 90,928 रुग्णांची नोंद
  तर 24 तासांत 325 कोरोनाबाधितांचा मृत्यू
  तर 19,206 रुग्णांनी कोरोनावर केली मात
 • 11:58 AM IST
  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह

  राज्यकीय नेते कोरोनाच्या विळख्यात
  राज्यातील 70 आमदार आणि 12 मंत्र्यांना कोरोनाची लागण
  आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार कोरोना पॉझिटिव्ह
 • 9:26 AM IST
  राज्यात अँटीजेन टेस्टवर भर, होम क्वारंटाईन कालावधी फक्त 7 दिवसांचा

  राज्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ
  याच पार्श्वभूमीवर राज्यात अँटीजेन टेस्टवर भर
  होम क्वारंटाईन कालावधी केला 7 फक्त दिवसांचा
  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 6, 2022 7:40 AM IST

Updated Date: January 6, 2022 6:11 PM IST