राज्यातील 11 जिल्हे सोडून इतर जिल्ह्यामध्ये सोमवारपासून कोरोनाचे निर्बंध राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने या जिल्ह्यांमध्ये सूट देण्यात आली आहे. पण काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्येत कधी वाढ होतेय तर कधी रुग्णसंख्या कमी होतेय. अशामध्ये राज्यासह देशात कोरोनाची नेमकी काय परिस्थिती आहे. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - दिलासादायक! 86 टक्के मुंबईकरांमध्ये सापडल्या कोरोनाच्या अँटीबॉडीज, 5व्या सेरो सर्वेक्षणातून माहिती समोर

Also Read - Breaking News Live Updates: महिला लसीकरण विशेष सत्रात मुंबईमध्ये 1.27 लाख महिलांनी घेतली लस
Also Read - Shiv sena- Bjp Alliance: मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Live Updates

 • 7:03 PM IST
  निवडणुकीची तयारी! सोनिया गांधी, राहुल गांधी मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा घेणार
  काँग्रेस स्थापना दिनी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी मुंबईत येणार
  28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस, राहूल गांधी शिवाजी पार्कवर सभा घेणार
  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
  काँग्रेसला संपवायला निघालेलेच संपलेत, अशा शब्दांत भाजपवर शरसंधान
 • 5:57 PM IST
  नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरीस, अखेर सुवर्ण पदक जिंकलेच!

  टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी
  नीरज चोप्राने सुवर्णपदक केले आपल्या नावावर
  नीरज चोप्रावर होतोय कौतुकाचा वर्षाव
 • 5:42 PM IST
  दिल्लीमध्ये दोन मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता

  दिल्लीमध्ये दोन मजली इमारत कोसळली
  दिल्लीच्या नंद नगरी भागत घडली घटना
  अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल
  ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता

 • 5:04 PM IST
  बजरंग पुनियाने कझाकीस्तानच्या खेळाडूचा पराभव करत कांस्य पदकावर कोरलं नाव

  टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनियाची जबरदस्त कामगिरी
  बजरंग पुनियाने कझाकीस्तानच्या खेळाडूचा केला पराभव
  कांस्य पदकावर बजरंग पुनियाने कोरले नाव
  भारताच्या झोळीत सहावे पदक
 • 2:42 PM IST
  मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅसची गळती

  अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल
  गॅस गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु
  रुग्णालयाने सतर्कता म्हणून रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवले
 • 10:39 AM IST
  जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश, एका दहशतवाद्यांचा खात्मा करत शस्त्रसाठा जप्त

  जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये चकमक
  जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
  एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश
  घटनास्थळावरुन एके-47 आणि पिस्तूल जप्त
 • 10:33 AM IST
  दिलासादायक! देशामध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण जास्त

  देशात कोरोनाचा वेग मंदावला
  नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त
  24 तासांत 38,628 नव्या रुग्णांची नोंद
  24 तासांत 40, 017 जण कोरोनामुक्त
  तर 617 कोरोनाबाधितांचा मृत्यू
 • 8:00 AM IST
  Breaking News Live Updates: सामान्यांच्या लोकल प्रवासाबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार – आदित्य ठाकरे

  कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देणार
  येत्या दोन दिवसांत सामान्यांच्या लोकल प्रवासाबाबत निर्णय घेणार
  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती