मुंबईसह उपनगरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पण कालपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. आजही मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यात पुन्हा वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसह देश-विदेशातील ताज्या घडामोडींवर एक नजर टाकूया…Also Read - Breaking News Live Updates: विनेश फोगाटचा पराभव, बेलारुसच्या कुस्तीपटूने 9-3 ने हरवले

Also Read - राज्याची चिंता वाढवणारी बातमी! पुण्यात आढळले Delta Plus विषाणूचे 2 रुग्ण
Also Read - Breaking News Live Updates: पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Live Updates

 • 6:48 PM IST
  मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

  – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची मागणी केली
  -मुंबई- औरंगाबाद- जालना- नांदेड- हैद्राबाद असा बुलेट ट्रेन मार्ग केंद्र सरकारकडे प्रस्तावित करण्याची मागणी केली
  अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलं पत्र
  -बुलेट ट्रेन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल हायस्पिड रेल कॉर्पोरेशनची स्थापना झाली -पुढील काळात मुंबई ते नागपूर तसेच पुणे, सोलापूर मार्गे मुंबई ते हैद्राबाद अशा मार्गांचे नियोजन केले जाते आहे
  – या नियोजनात मराठवाड्याला योग्य न्याय मिळालेला नसल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं
 • 3:16 PM IST
  ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न
  दारु पिऊन झोपेच्या गोळ्या घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न
  दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु
  कांता प्रसाद यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
  कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळात मिळाली होती प्रसिद्धी
 • 2:11 PM IST
  माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत कोरोना पॉझिटिव्ह
  कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही झाली लागण
  मुंबईतील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल
 • 2:02 PM IST
  18 वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देणार
  पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
  21 जूनपासून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु होणार
  या लसीकरण मोहीमेबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर
  देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्यास सरकार वचनबद्ध
  कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे लागेल
 • 1:56 PM IST
  भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट
  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून सुरु होणार
  पावसामुळे सामना होईल की नाही यात शंका
  साऊदम्पटनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानावर हा सामना होणार
 • 10:52 AM IST
  अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण

  एनआयएने आणखी दोन जणांना घेतले ताब्यात
  आतापर्यंत या प्रकरणात 10 जणांना अटक
  गुरुवारी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना अटक करण्यात आली
  प्रदीप शर्मांच्या दोन सहऱ्यांना देखील करण्यात आली होती अटक
 • 7:43 AM IST
  मुंबईला पावसाने झोडपले, मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू

  मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु
  मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर कायम
  मुसळधार पावसामुळे मुलुंडमध्ये संरक्षण भिंत कोसळली
  अंगावर भिंत पडल्याने गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू
  मुलुंडच्या कलपादेवी पाडा परिसरातील घटना