महाराष्ट्रातील जनतेची आणखी चिंता वाढली आहे. डेल्टा प्लस विषाणूची (Delta Plus Virus) लागण झालेले 21 रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. सर्वाधिक नऊ रुग्ण रत्नागिरीत आहेत. दुसरीकडे, उत्तर प्रदेश, पंजाबसह पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात देशव्यापी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना आणखी वेग आलाय. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया…Also Read - Maharashtra Crisis Live: राजकीय वातावरणामुळे शिवसैनिक होऊ शकतात आक्रमक, राज्यातील पोलिस हाय अलर्टवर

Also Read - Eknath Shinde Video : मोठी बातमी! एकनाथ शिंदेचा नवा व्हिडिओ व्हायरल, म्हणाले - 'देशातील एक राजकीय पक्ष...'

Also Read - Eknath Shinde Tweet : 'ही आहे आमदारांची भावना...'; एकनाथ शिंदेंनी पत्र ट्वीट करत मनातील खदखद केली व्यक्त!

Live Updates

 • 10:10 PM IST
  राज्यात आज 10 हजार 66 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
  राज्यात आज दिवसभरात 11 हजार 32 रूग्ण कोरोनातून मुक्त
  राज्यात आजपर्यंत 57,53,290 कोरोनाबाधित रुग्ण बरे; रिकव्हरी रेट 95.93 टक्क्यांवर
  राज्यातील कोरोनाचा सध्याचा मृत्यूदर 1.99 टक्के एवढा
 • 7:01 PM IST
  राजावाडी रुग्णालयात एका रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याच्या घटनेवरून भाजप आक्रमक
  “सामान्य माणसाचे डोळे उंदीर कुरतडतोय, तर मुंबई महापालिकेला शिवसेनेनं कुरतरडलं”
  भाजपचे आमदार आशिष शेलार यांचा शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल
 • 6:36 PM IST
  भाजपात जाणं मोठी चूक होती म्हणत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची घरवापसी
  मुंडण आणि शुद्धीकरण करून 200 कार्यकर्त्यांची तृणमूलमध्ये ‘घरवापसी’
  तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेल काही कार्यकर्ते निवडणुकीनंतर बॅकफूटवर
  हुगळी जिल्ह्यात 200 कार्यकर्त्यांचा भाजपामधून बाहेर पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
 • 3:44 PM IST
  विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहूल चौक्सीला मोठा झटका; 9371 कोटींची मालमत्ता जप्त
  बँकांना गंडा घालून परदेशात फरार विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला ED चा मोठा झटका
  नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहुल चौक्सी यांची 18 हजार 170 कोटींची मालमत्ता जप्त
  9371 कोटींची कोटींची मालमत्ता सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली
  तिन्ही उद्योगपतींनी सार्वजनिक बँकांचं कर्ज बूडवून परदेशात केला पोबारा
 • 1:50 PM IST
  पाकिस्तानात दहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ मोठा बॉम्बस्फोट, 2 ठार, 15 जखमी
  पाकिस्तानात लाहोरमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट, 2 ठार , 5 जण जखमी
  दहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ झाला बॉम्बस्फोट
  पोलिस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल
  नेमका हल्ला कुणी आणि कशासाठी केला, याबाबत तपास सुरू
  स्फोट इतका जबरदस्त होता की, आजुबाजुचा परिसर हादरला
 • 12:50 PM IST
  महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी! छगन भुजबळांनी घेतला आक्षेप

  ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी होण्याची चिन्ह
  5 जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूक जाहीर झाल्या, त्यावर छगन भुजबळांनी घेतला आक्षेप
  कोविड काळात निवडणुका थांबवण्यात यावी, अशी भूमिका मांडणार- छगन भुजबळ
 • 8:53 AM IST
  शिवसेना नेते अनिल परबांना भ्रष्टाचार प्रकरणी क्लीन चिट
  शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा
  प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार प्रकरणी तक्रार दाखल झाली होती तक्रार
  तक्रारीत तथ्य नसल्याचं नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडून स्पष्टीकरण
  पदोन्नतीमध्ये गैरव्यहार केल्याचा अनिल परब यांच्यावर होता आरोप
 • 7:48 AM IST
  जेट एअरवेज पुन्हा करू शकते उड्डाण, मार्ग मोकळा होण्याची शक्यता
  दोन वर्षांपूर्वी दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर गेलेली जेट एअरवेज पुन्हा उड्डाण करू शकते.
  नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलची (NCTL) जेट एअरवेजसाठी जालान-कालरॉक कन्सॉर्टियमच्या तोडगा योजनेचा सशर्त मंजुरी
  एनसीएलटीच्या पीठाकडून योजना कार्यान्वित करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी
  एप्रिल 2019 पासून बंद आहे जेटचे परिचालन