देशासह राज्यात कोरोनाची नेमकी काय परिस्थिती आहे. यासोबतच देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर…Also Read - Hina Khan Photos: व्हाइट साडीत खुलले हिना खानचे सौंदर्य, पाहिला नसेल असा हटके लूक!

Also Read - Mumbai Rape and Murder : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून चाकूने केले 48 वार

Also Read - Dussehra Melava 2022 : खरी शिवसेना कोणाची? दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरू झालं पोस्टर वॉर

Live Updates

 • 6:59 PM IST

  जलसंपदा मंत्री जयंत पाटील प्रकृती अस्वस्थामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात
  अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयात
  जयंत पाटील यांनी नुकताच केला होता सांगली, कोल्हापूर पूरस्थिती पाहणीसाठी दौरा

 • 5:16 PM IST
  शिल्पा शेट्टीला क्लीन चीट नाहीच; पती राज कुंद्रामुळे अडचणीत येण्याची शक्यता
  राज कुंद्राच्या बँकेचे व्यवहार आणि बँक खात्याची चौकशी केली जाणार
  शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचं PNB बँकेतील खातं संशयाच्या घेऱ्यात
  राज कुंद्राच्या या अकाऊंटमध्ये पॉर्नोग्राफी व्यवसायातील पैसे जमा करत असल्याची माहिती
  शिल्पा-राज यांचं हे जॉईंट अकाऊंट असल्यामुळे शिल्पाकडून देखील या पैशाचा वापर
 • 2:16 PM IST
  मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा

  मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा
  23 ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश
  एनएसईएल आणि टॉप्स सिक्युरिटीज प्रकरणात ईडीने केली कारवाई
  कारवाईविरोधात प्रताप सरनाईक यांच्यासह विहंग आणि पूर्वेश या त्यांच्या दोन्ही मुलांनी कोर्टात घेतली होती धाव
 • 12:09 PM IST

  कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची बसवराज बोम्मई यांनी घेतली पद आणि गोपनियतेची शपथ
  बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे 23 वे मुख्यमंत्री बनले
  बसवराज बोम्मई कार्यवाहक मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पा यांचे उत्तराधिकारी
  बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा बंगळुरुत जल्लोष

 • 9:08 AM IST
  पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठविरुद्ध FIR दाखल

  सॉफ्ट पोर्नोग्राफी प्रकरणाला नवं वळण
  राज कुंद्राच्या अडचणीत मोठी वाढ
  कंपनीच्या तीन निर्मात्यांसह गहना वशिष्ठविरूद्ध मुंबईच्या मालाड मालवानीमध्ये FIR दाखल
  गहना वशिष्टनं हॉटशॉटसाठी केला होता कॉन्टेंट
 • 8:05 AM IST
  हरियाणाहून बिहारला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, 18 प्रवाशांचा मृत्यू
  बाराबंकीजवळ ट्रक-बसची धडक
  अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
  लखनौ-अयोध्या मार्गावर कल्याणी पुलावर झाला अपघात

 • 8:04 AM IST
  कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदासाठी बसवराज बोम्मई यांच्या नावावर शिक्कामोर्तब
  भाजपचे निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून बसवराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा
  आज, बुधवारी सकाळी 11 वाजता घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ