BSF Constable Recruitment 2022: BSF मध्ये नोकरीची सूवर्णसंधी, 10 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज, पगारही दमदार
BSF Constable Recruitment 2022: सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरी (Sarkari Naukri) करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. BSF मध्ये 2788 पदांसाठी (BSF Constable Recruitment) अर्ज मागवण्यात आले आहेत.

BSF Constable Recruitment 2022: सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरी (Sarkari Naukri) करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. BSF मध्ये 2788 पदांसाठी (BSF Constable Recruitment) अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छूक उमेदवार अधिकृत वेबसाईट bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जानेवारीपासून (BSF Job) सुरू झाली आहे. अर्ज करण्याची (Government Job) शेवटची तारीख 10 मार्च आहे.
Also Read:
- SSC GD Constable Notification 2022: जीडी कॉन्स्टेबलच्या 24,369 पदांसाठी बंपर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार!
- ICMR Recruitment 2022 : आयसीएमआरमध्ये विविध पदांसाठी भरती, 20 सप्टेंबरपूर्वी असा करा अर्ज!
- ITBP Constable Recruitment 2022 : देशसेवेची सुवर्णसंधी! आयटीबीपीमध्ये 108 जागांवर भरती, असा करा अर्ज
शैक्षणिक पात्रता: (BSF Constable Recruitment 2022)
– उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. किंवा त्याने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.
– दोन वर्षे कामाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
– या शिवाय इंडस्ट्रियल ट्रेनिंग ऑफ व्होकेशनल इन्स्टिट्यूटमधून एक किंवा दोन वर्षांचा संबंधित ट्रेडमध्ये कोर्स केलेला असावा.
– अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे असावे.
निवड प्रक्रिया: (BSF Constable Recruitment 2022)
– या पदांसाठी निवडीसाठी परीक्षा अनेक टप्प्यात घेतली जाईल.
– परीक्षेनंतर उमेदवारांची पडताळणी होईल.
– निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी, वैद्यकीय चाचणी, शारीरिक मानक चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि ट्रेड टेस्टचा समावेश असेल.
किती असेल पगार?
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 2788 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये पुरुषांसाठी 2651 पदे असून महिला उमेदवारांसाठी 137 पदे निश्चित करण्यात आली आहेत. निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल-3 नुसार 21,700-69,100 च्या श्रेणीत पगार मिळेल.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या