Top Recommended Stories

BSF Constable Recruitment 2022: बीएसएफमध्ये भरतीसाठी दोन दिवस शिल्लक, आत्ताच करा अर्ज, आकर्षक पगार

BSF Constable Recruitment 2022: सीमा सुरक्षा दलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बीएसएफने नुकतेच एक नोटीफिकेशन जारी करून अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

Published: February 28, 2022 11:44 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

BSF Employment News
BSF Constable Recruitment 2023

BSF Constable Recruitment 2022: सीमा सुरक्षा दलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बीएसएफने (BSF Recruitment 2022) नुकतेच एक नोटीफिकेशन जारी करून अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) (पुरुष आणि महिला) पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. सरकारी नोकरी (Sarkari Nokari) शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार बीएसएफची (BSF Vacancy 2022) अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज (BSF Recruitment 2022) करू शकतात.

Also Read:

BSF Recruitment 2022: अर्ज करण्यासाठी दोन दिवस शिल्लक

कृपया लक्षात घ्या की अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 मार्च 2022 आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते अधिकृत वेबसाइट bsf.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी (BSF Jobs 2022) 10वी उत्तीर्ण महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती (Government Jobs) प्रक्रियेद्वारे एकूण 2788 पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

You may like to read

BSF Recruitment 2022: पात्रता आणि वयोमर्यादा

या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे 2 वर्षांचा अनुभवासह 10वी उत्तीर्ण किंवा व्यावसायिक संस्थेतून ITI मध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा असावा. तर अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावी. या भरती परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. त्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रेही लागतील.

असा करा अर्ज (BSF Recruitment 2022 How to Apply)

  • सर्व प्रथम उमेदवाराला अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जावे लागेल आणि येथे अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • येथे पुरुष उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल.
  • महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
  • निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 रुपये ते 69,100 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
  • तसेच या लिंकवर https://rectt.bsf.gov.in/static/bsf/pdf/Constable%20(Tradesman)%20BSF जाऊन उमेदवारांना भरतीसंदर्भातील अधिकृत अधिसूचना पाहता येईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 28, 2022 11:44 AM IST