By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
BSF Recruitment 2022: बीएसएफमध्ये ग्रुप-बी पदांसाठी भरती जाहीर, 1,40,000 रुपये पगार, जाणून घ्या पात्रता
BSF Recruitment: सीमा सुरक्षा दलात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बीएसएफमध्ये ग्रृप बीच्या 90 पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. या भरती अंतर्गत निरीक्षक, उपनिरीक्षक आणि इतर पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

BSF Recruitment: सीमा सुरक्षा दलाचे महासंचालकांना ग्रृप बीच्या 90 पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अधिसूचनेनुसार बीएसएफकडून या भरती अंतर्गत निरीक्षक, उपनिरीक्षक आणि इतर पदांवर उमेदवारांची निवड (BSF vacancies 2022) केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in ला भेट द्यावी लागेल. उमेदवारांना नोकरीची (BSF Jobs 2022) जाहिरात जारी झाल्यापासून 45 दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल.
या भरतीसंदर्भातील जाहिरात (Governament jobs) एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23 ते 29 एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. आर्किटेक्ट आणि कनिष्ठ अभियंते या पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी उमेदवार थेट या https://docs.bsf.gov.in/uploads/bsf संकेतस्थळावर क्लिक करून भरतीसंदर्भातील (sarkari naukari) अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना संपूर्ण अधिसूचना वाचण्याचा सल्ला दिला जातो.
BSF Recruitment 2022: भरतीचा तपशील
इन्स्पेक्टर (आर्किटेक्ट): 01 पद
पे स्केल: 44900 ते 142400/- स्तर-7
सब इन्स्पेक्टर (वर्क्स) : 57 पदे
पे स्केल: 35400 ते 112400/- स्तर-6
जूनियर इंजिनियर/सब इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल): 32 पदे
पे स्केल: 35400 ते 112400/- स्तर-6
Trending Now
BSF Recruitment 2022: महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख: 25 एप्रिल 2022
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 08 जून 2022
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 08 जून 2022
BSF Recruitment 2022: आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
इन्स्पेक्टर आर्किटेक्ट (Inspector Architect) : आर्किटेक्चर पदवी असलेले आणि अधिनियम 1972 अंतर्गत कौन्सिल फॉर आर्किटेक्चर अंतर्गत नोंदणीकृत उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
सब इन्स्पेक्टर (वर्क्स) (Sub Inspector Works): उमेदवाराने केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील तीन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा आणि उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
जूनियर इंजिनियर/सब इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल ) (Junior Engineer/Sub Inspector Electrical) : उमेदवाराने केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून तीन वर्षांचा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा आणि उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
BSF Recruitment 2022 : निवड प्रक्रिया आणि अर्ज शुल्क
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेवर आधारित असेल. तसेच प्रशस्तिपत्रे/कागदपत्रांची तपासणी, शारीरिक मानकांचे मोजमाप (PST) आणि तपशीलवार वैद्यकीय तपासणी (DME) केली जाईल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 200 अर्ज शुल्क भरावे लागेल. तर महिला/एससी/एसटी श्रेणीतील उमेदवार आणि माजी सैनिकांकडून कोणतेही शुल्क आकरले जाणार नाही. उमेदवार हे शुल्क नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा ई-चलन द्वारे भरू शकतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या