Top Recommended Stories

BSF Recruitment 2022: बीएसएफमध्ये नोकरीची सुवर्ण संधी, महिला उमेदवारही करू शकतात अर्ज, जाणून घ्या पात्रता

देशाची सेवा करू इच्छिणाऱ्यांसाठी आणि सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी बीएसएफकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Published: January 16, 2022 6:30 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

BSF Head Constable Recruitment 2022 Sarkari Naukri In Border Security Force steps to apply online at bsf go in

Border Security Force Jobs 2022 : देशाची सेवा करू इच्छिणाऱ्यांसाठी आणि सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी बीएसएफकडून (BSF) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी (Border Security Force Constable Jobs) अर्ज मागविण्यात येत आहेत.

Also Read:

इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांवर भरतीसाठी (BSF Recruitment 2022) बीएसएफच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये (Employment News Date) अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसांच्या आत आहे. हे लक्षात ठेवा की अर्ज करण्यासाठी उमेदवारांना bsf.gov.in या वेबसाइटवर (Last Date) जावे लागेल.

You may like to read

BSF Recruitment 2022: या पदांवर केली जाईल भरती

सीमा सुरक्षा दलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 2788 पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये 2651 पदांवर पुरुष उमेदवारांची तर 137 जागांवर महिला उमेदवारांची भरती केली जाणार आहे. (Opportunity to Work in BSF, Men and Women Candidates Can Apply, Find Out Eligibility)

BSF Recruitment 2022: आवश्यक पात्रता

अधिसूचनेनुसार या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून मॅट्रिक उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित ट्रेडमधील दोन वर्षांचा कामाचा अनुभव किंवा इंडस्ट्रियल ट्रेनिंग ऑफ प्रोफेशनल इन्स्टिट्यूटमधून एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह ट्रेडमधील एक वर्षाचा अनुभव किंवा दोन वर्षांचा डिप्लोमा. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 16, 2022 6:30 PM IST