By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
BSF Soldier Wedding : बीएसएफ जवानाचं लग्न, सैन्याने नवरदेवाला पाठविले थेट हेलिकॉप्टरने!
BSF Soldier Wedding : सुरक्षा दलाने (BSF) गुरुवारी एका जवानाला त्याच्या लग्नासाठी (wedding ceremony) वेळेवर जाता यावं, यासाठी चक्क हेलिकॉप्टरने त्याला त्याच्या गावी पाठविले. सध्या एलओसी पोस्ट बर्फानं झाकलेलं आहे. तसेच काश्मीर खोऱ्याच्या मार्गाचा संपर्क सध्या बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या हेलिकॉप्टरच्या (Helicopter ) हे एकमेव उपलब्ध वाहतुकीचं साधन आहे.

BSF Soldier Wedding : भारतीय सैन्यात (Indian Army ) जवानांना ( Soldier ) विशेष महत्त्व आहे. जवानांच्या सुविधेसाठी सैन्य दल कायम प्रयत्नशील असते. अशातच सीमा सुरक्षा दलाने ( BSF ) गुरुवारी एका जवानाला त्याच्या लग्नासाठी ( wedding ceremony ) वेळेवर जाता यावं, यासाठी चक्क हेलिकॉप्टरने त्याला त्याच्या गावी पाठविण्यात आले. सध्या एलओसी पोस्ट बर्फानं झाकलेलं आहे. तसेच काश्मीर खोऱ्याच्या मार्गाचा संपर्क सध्या बंद आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जावानाला पाठविण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) रिमोट पोस्टवर तैनात असलेल्या या जवानाला ओडिशात 2, 500 किमी दूर त्याच्या गावी जायचे होते.
याबाबत सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, नियंत्रण रेषेजवळील माछिल सेक्टरमध्ये अत्यंत उंचावरच्या चौकीवर हा जवान तैनात असून 30 वर्षीय या जवानाचे नाव कॉन्स्टेबल नारायण बेहरा आहे. या जवानाचे 2 मे 2022 रोजी लग्न होणार आहे. अवघ्या दोन-तीन दिवसांवर लग्न येऊन ठेपले. त्यात सध्या एलओसी पोस्ट बर्फानं झाकलेलं आहे आणि काश्मीर खोऱ्याशी जोडणारा मार्गाचा संपर्क सध्या बंद आहे. या ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांसाठी लष्करी हवाई उड्डाण हे एकमेव उपलब्ध वाहतुकीचं साधन आहे.
जवानाच्या पालकांनी साधला अधिकाऱ्यांशी संपर्क
लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले असताना जवान नारायण बेहरा हे घरी पोहचले नसल्याने चिंतेत असलेल्या पालकांनी नुकतेच त्याच्या युनिट कमांडरशी संपर्क साधला. त्यांची लग्नाच्या तारखेची सर्व तयारी पूर्ण झाल्यामुळे ते चिंतेत होते. आपला मुलगा आपल्या लग्नासाठी वेळेवर पोहोचू शकणार नाही, असं त्यांना वाटत होतं. ही बाब महानिरीक्षक (काश्मीर फ्रंटियर) राजा बाबू सिंह यांच्या निदर्शनास येताच त्यांनी श्रीनगरमध्ये तैनात असलेल्या हेलिकॉप्टरने जवान नारायण बेहराला तत्काळ एअरलिफ्ट करण्याचे आदेश दिले. यावर सिंग म्हणाले की, त्यांनी हवाई सेवेला मान्यता दिली. कारण, सैनिकांचं कल्याण हे त्यांचं ‘प्रथम आणि सर्वात महत्त्वाचं प्राधान्य’ आहे. त्यानुसार गुरुवारी पहाटे हेलिकॉप्टरने बेहरा यांना श्रीनगरला आणलं गेलं. ते आता ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील आदिपूर गावात आपल्या घरी जाणार आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या