Top Recommended Stories

BSNL New Plan : BSNLचा जबरदस्त प्लॅन! 197 रुपयांत मिळावा 150 दिवस चालणार प्लॅन, दररोज मिळतो 2GB डेटा

BSNL New Plan : खासगी कंपन्यांनी रिचार्ज महाग केले असताना बीएसएनएलने एक आकर्षक योजना ग्राहकांसाठी आणली आहे. या योजनेंतर्गत बीएसएनएल तुम्हाला 197 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर दररोज 2GB डेटासहा 150 दिवसांची वैधता देत आहे.

Published: February 26, 2022 9:45 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Cabinet approves ₹1.64 lakh crore BSNL revival package
Cabinet approves ₹1.64 lakh crore BSNL revival package

BSNL New Plan : मोबाईल युजर्सना वाढलेल्या प्रीपेड रिचार्जचा (prepaid recharge)  फटका सहन करावा लागत आहे. देशातील सर्व खासगी दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढविल्या आहेत. अशात तुम्हाला देखील खाजगी कंपन्यांचे हे वाढलेले रिचार्ज करणे परवडत नसेल. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. खासगी कंपन्यांनी रिचार्ज महाग केले असताना बीएसएनएलने  (BSNL) एक आकर्षक योजना (best plan of bsnl) ग्राहकांसाठी आणली आहे. या योजनेंतर्गत बीएसएनएल तुम्हाला 197 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर दररोज 2GB डेटासहा 150 दिवसांची वैधता देत आहे. इतर खासगी कंपन्यांच्या तुलनेत हा प्लॅन स्वस्त आहे. चला तर मग जाणून घेऊ या प्लॅनबद्दल…

Also Read:

असा आहे प्लॅन –

BSNLचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन सध्या उपलब्ध असलेल्या इतर प्लॅनच्या तुलनेत आकर्षित आहे. युजर्सला अमर्याद कॉल, दररोज 2GB डेटा आणि मोफत एसएमएस फक्त 197 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळत आहे. सोबतच 150 दिवसांची वैधता मिळत आहे. प्लॅननुसार दररोज 2GB डेटा पहिल्या 18 दिवसांसाठी आहे. त्यानंतर 40kbps वर इंटरनेट सेवा वापरता येईल. यासह पहिल्या 18 दिवसांसाठी विनामूल्य अमर्याद कॉल देखील मिळेल. तर प्लॅन वैधतेदरम्यान म्हणजे 150 दिवस इनकमिंग कॉल सुरु राहतील.

तर करावा लागेल प्लॅन टॉप-अप –

पहिल्या 18 दिवसांनंतर जर तुम्हाला कॉलिंग करायचे असल्यास तुम्हाला प्लॅन टॉप-अप करावा लागेल. यात तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि झिंग अॅप सबस्क्रिप्शन दिले जाते. ही सुविधा पहिल्या 18 दिवसांसाठीच आहे. फायदे संपल्यानंतर तुम्हाला हवे असल्यास पुन्हा प्लॅन टॉप-अप किंवा डेटा व्हाउचरची निवड करू शकतात. नाही तरी तुम्ही टॉप-अप न करता 180 दिवस तुमचा नंबर वापरने सुरूच ठवू शकतात. जे युजर्स फार कमी कॉल करतात त्यांच्यासाठी हा प्लॅन खूपच फायदेशीर आहे.

You may like to read

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 26, 2022 9:45 PM IST