Budget 2022: अर्थसंकल्प म्हणजे काय?, सामान्य नागरिकांनी असं समजून घ्या!
Budget 2022: राष्ट्रपती प्रत्येक आर्थिक वर्षासंबंधी संसदच्या दोन्ही सदनात भारत सरकारचे अंदाजित उत्पन्न आणि खर्चाचे विवरण सादर करतात.

Budget 2022 : आपण सर्वांच्या कानावर बजेट हा शब्द बराच वेळा पडतो. आपल्या दैनंदिन जीवनात अर्थसंकल्पाला खूप महत्व असून प्रत्येक जण दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाची (Budget 2022) प्रतीक्षा करतो. केंद्रीय बजेट सरकारची सार्वजनिक नीती (public policy), वित्तीय धोरण (financial policy), सर्व महसूल (Revenue) आणि त्याचा खर्च, महसुली तूट (Revenue deficit), जमा निधीतून खर्च, विविध कर प्रस्ताव, कल्याणकारी आणि प्रोत्साहन योजना, कर्ज आणि व्यजाचा संपूर्ण तपशील अर्थसंकल्पामध्ये असतो.
Also Read:
- President Election 2022: राष्ट्रपतींना किती पगार मिळतो? कोण-कोणत्या सुविधा असतात? एका क्लिकवर घ्या जाणून
- Expensive Things In 2022: उद्यापासून तुमच्या खिशाला लागणार कात्री, या गोष्टींसाठी द्यावे लागणार जास्त पैसे!
- More Expensive Things In 2022: महागाईचा स्फोट! 1 एप्रिलपासून 'या' गोष्टी महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री!
तसं पाहायला गेले तर, विविध प्रासंगिक नियम (relevant rules), कायदे (Laws) आणि यात वापरण्यात आलेल्या प्रमुख शब्द समजून घेतल्याशिवाय सर्व सामान्य नागरिकांना केंद्रीय अर्थसंकल्प समजने कठीण आहे. त्यामुळे बऱ्याचदा लोकांना बजेटची पूर्णपाने समजू शकत नाहीत. यासह विविध तरतुदींची (Provision) चुकीची व्याख्या करत गैरसमज करून घेतात. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पासंबंधित पायाभूत बाबी, कायदे (Laws), नियम(Rules), प्रमुख अटी आणि प्रासंगिक तरतुदींचा अभ्यास आवश्यक आहे.
काय आहे केंद्रीय अर्थसंकल्प (what is the central budget) –
भारतीय संविधानातील अनुच्छेद 112 मध्ये तरतूद करण्यात आली आहे की, राष्ट्रपती (president) प्रत्येक आर्थिक वर्षासंबंधी संसदच्या दोन्ही सदनात भारत सरकारचे अंदाजित उत्पन्न आणि खर्चाचे विवरण सादर करतील. त्याला ‘वार्षिक वित्तीय विवरण’ म्हटले जाते. त्यालाच सामान्य भाषेत अर्थसंकल्प म्हणतात. त्यानुसार भारत सरकार अर्थमंत्री यांच्या माध्यमातून दरवर्षी 1 फ्रब्रुवारी रोजी संसद भवनात ‘केंद्रीय अर्थसंकल्प’ सादर करता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या