Budget 2022 : कसं तयार केलं जातं बजेट? समजून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यात अनेक गोष्टींचा समावेश असतो. ज्या विविध स्तरांवर पूर्ण करणे आवश्यक असतात. वित्त मंत्रालय इतर मंत्रालये, विभाग आणि अधिकारी यांच्या मदतीने आणि सहकार्याने बजेट तयार केले जाते.

Updated: January 29, 2022 8:06 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

BUDGET 2023

Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) तयार करण्यात अनेक गोष्टींचा समावेश असतो. ज्या विविध स्तरांवर पूर्ण करणे आवश्यक असतात. वित्त मंत्रालय (Ministry of Finance), इतर मंत्रालये, विभाग आणि अधिकारी यांच्या मदतीने आणि सहकार्याने बजेट तयार केले (How Budget prepared) जाते. ज्या आर्थिक वर्षासाठी (financial year) अर्थसंकल्प तयार केला जातो त्या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक तयार करण्याशी संबंधित तयारीचे काम त्या आर्थिक वर्षाच्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये म्हणजेच अर्थसंकल्प (Budget 2022) सादर होण्याच्या 5 ते 6 महिन्यांपूर्वी सुरू होते.

Also Read:

डेटा संकलन (Data collection)

वित्त मंत्रालयाचे अधिकारी संबंधित मंत्रालये आणि विभागांना त्यांच्या चालू आणि मागील आर्थिक वर्षातील आर्थिक खर्च-महसूल आणि पुढील आर्थिक वर्षासाठीच्या आर्थिक आवश्यकतांबद्दल तपशील मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांसह परिपत्रके आणि मसुदा फॉर्म पाठवतात. त्यानंतर संबंधित विभागाचे क्षेत्रीय आणि तळागाळातील अधिकारी संबंधित डेटा संकलित (Data collection) करतात आणि अंदाजपत्रकांसह संबंधित उच्चस्तरीय अधिकार्‍यांना पाठवतात.

अंदाजपत्रकांची छाननी (Scrutiny of budget)

संबंधित विभागाचे उच्च अधिकारी त्यांना मिळालेली आकडेवारी आणि अंदाजपत्रकांची छाननी करतात आणि आवश्यक दुरुस्त्या करून आवश्यक असल्यास ते संबंधित मंत्रालयाकडे पाठवतात. संबंधित मंत्रालये आकडे आणि अंदाजांची पुढील छाननी करतात आणि नंतर ते वित्त मंत्रालयाकडे पाठवतात. वित्त मंत्रालयाकडून विविध मंत्रालयांकडून प्राप्त झालेल्या डेटा आणि अंदाजांचे पुढील पुनरावलोकन आणि छाननी (Data Verification) करण्यात येते.

वित्तमंत्रालयाकडून डेटा छाननी (Data scrutiny)

अंदाजपात्राची छाननी करतांना विशेष खबरदारी घेतली जाते. कारण एका आर्थिक वर्षाच्या अटी इतर आर्थिक वर्षांच्या सारख्या नसतात. वित्तमंत्रालयाचा छाननीबाबतचा दृष्टिकोन हा इतर मंत्रालयापेक्षा वेगळा असतो. इतर मंत्रालये खर्च किंवा त्याची गरज या धोरणात्मक बाबीशी संबंधित आहेत. तर अर्थ मंत्रालय मुख्यतः देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. त्यानुसार मंत्रालय त्यांची व्यवहार्यता सुनिश्चित करण्यासाठी सध्याची आर्थिक परिस्थिती आणि उपलब्ध संसाधनांसह अंदाजे सहसंबंधित करते. या अभ्यासाला खूप महत्त्व आहे. कारण त्याचा प्रभाव विविध महसूल वाटप आणि कल्याणकारी उपाययोजनांवर होतो.

मंत्रालयांना महसूल वाटप

पुढील टप्प्यात वित्तमंत्रालय विविध प्रशासनिक मंत्रालयांना महसूल वाटप करते. जर संसाधनाच्या वाटपावरून कोणत्याही मंत्रालयाशी वाद झाल्यास हा वाद कॅबिनेट (cabinet) किंवा पंतप्रधान (Prime Minister) यांच्या दालनात जातो आणि त्यांच्या निर्णयाला अंतिम निर्णय मानले जाते.

पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक

यानंतर वित्त मंत्रालय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) मिळून पुढील आर्थिक वर्षासाठी महसूल अंदाज तयार करण्यासाठी काम करते. विविध उद्योग, व्यापार संघटना, व्यावसायिक संस्था, अर्थतज्ज्ञ आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागधारकांकडून मिळालेल्या सूचना आणि मतांचा विचार केल्यानंतर, अंतिम अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अहवाल एकत्रित केले जातात.

‘हलवा समारंभ’

अर्थसंकल्पीय कागदपत्रांची छपाई साधारणत: संसदेत अर्थसंकल्प सादर होण्याच्या किमान एक आठवडा आधी सुरू होते. ही छपाई प्रक्रिया ‘हलवा समारंभ’ म्हणून साजरी केली जाते. जो भारतीय प्रथेचा एक भाग आहे. यात अर्थमंत्री (FM) आणि अर्थसंकल्प तयार करण्यात गुंतलेले इतर अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी यांच्यासोबत ‘हलवा’ तयार केला जातो आणि खाल्ला जातो. प्रथेप्रमाणे ‘हलवा समारंभ’ वित्त मंत्रालयाद्वारे आयोजित केला जातो. याला अर्थसंकल्पीय कार्यक्रमांची अधिकृत सुरुवात म्हटले जाते. त्यानंतर अंतिम टप्प्यात ‘केंद्रीय अर्थसंकल्प’ अर्थमंत्री संसदेत सादर करतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 29, 2022 8:05 PM IST

Updated Date: January 29, 2022 8:06 PM IST