Top Recommended Stories

Budget 2022: किती प्रकारचे असते बजेट? जाणून घ्या कधी सादर केला जातो तुटीचा अर्थसंकल्प?

Budget 2022 : सरकारी अर्थसंकल्प हा एक आर्थिक दस्तऐवज आहे. यामध्ये वर्षभरातील महसूल आणि खर्चाचा समावेश असतो. त्यानुसार अर्थसंकल्पाचे तीन श्रेणीत वर्गीकरण केले जाते.

Published: January 30, 2022 7:30 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Budget 2022: किती प्रकारचे असते बजेट? जाणून घ्या कधी सादर केला जातो तुटीचा अर्थसंकल्प?

Budget 2022 : सरकारी अर्थसंकल्प (Government Budget) हा एक आर्थिक दस्तऐवज (Financial Documents) आहे. यामध्ये वर्षभरातील महसूल (revenue) आणि खर्चाचा समावेश असतो. त्यानुसार अर्थसंकल्पाचे तीन श्रेणीत वर्गीकरण केले जाते. यात संतुलित अर्थसंकल्प, अतिरिक्त अर्थसंकल्प आणि तुटीचा अर्थसंकल्पाचा समावेश आहे.

Also Read:

संतुलित अर्थसंकल्प (Balanced Budget)

संतुलित अर्थसंकल्पात (Balanced Budget) अनुमानित शासकीय खर्च (Estimated of Government Spending) एका वित्तीय वर्षातील अनुमानित महसुलाच्या बरोबर होतो. अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते (according to Economist) शासनाचा खर्च हा त्यांच्या महसुलापेक्षा जास्त असता कामा नये. अर्थतज्ज्ञांकडून ही परिस्थिती आदर्श मानली जात असली तरी हे साध्य करणे सत्ताधारी यंत्रणेसाठी खूप कष्टाचे काम असते. चलनवाढ (Inflation) किंवा आर्थिक मंदीच्या काळात अतिरिक्त खर्चाला वाव नसतांना संतुलित अर्थसंकल्प आपोआप आर्थिक स्थिरतेमध्ये बदलत नाही. अशा अर्थसंकल्पाची जमेची बाजू अशी आहे की, तो अनावश्यक सरकारी खर्चाला आळा घालतो. या प्रकारचा अर्थसंकल्प विकसनशील देशासाठी व्यवहार्य मानला जात नाही. कारण तो सार्वजनिक कल्याणकारी योजनांवर खर्चाची व्याप्ती मर्यादित करतो.

You may like to read

अतिरिक्त अर्थसंकल्प (Surplus Budget)

अतिरिक्त अर्थसंकल्पालाच शिलकी अर्थसंकल्प (Surplus Budget) देखील म्हणतात. अपेक्षित महसूल एका आर्थिक वर्षातील अंदाजित खर्चापेक्षा जास्त असतो. याचा अर्थ सरकारला करातून मिळणारे उत्पन्न हे सरकार लोककल्याणासाठी (welfare scheme) खर्च केलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे. अतिरिक्त अर्थसंकल्प देशाची आर्थिक संपन्नता दर्शवितो. ज्याचा अर्थ अतिरिक्त पैसे देय रक्कम भरण्यासाठी वापरले जाऊ शकतात. ज्यामुळे देय व्याज कमी होते आणि अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन मदत होते. एकूण मागणी (Demand) कमी करण्यासाठी महागाईच्या काळात अशा अर्थसंकल्पाचा विचार केला जाऊ शकतो. आर्थिकमंदी आणि चलनवाढीच्या परिस्थितीत सरकारसाठी हा अर्थसंकल्प उपयुक्त नसतो.

तुटीचा अर्थसंकल्प (Deficit Budget)

तुटीच्या अर्थसंकल्पात (Deficit Budget) अंदाजित खर्च हा वित्तीय वर्षात (financial year) येणाऱ्या महसुलापेक्षा जास्त असतो. तुटीचा अर्थसंकल्प मंदीच्या काळात आणि रोजगार दर वाढवण्यासाठी मदत करतो. हा अर्थसंकल्प मंदीच्या काळात अतिरिक्त मागणी निर्माण करण्यास आणि आर्थिक विकासाला चालना देण्यास मदत करतो. शासन सामान्यतः सरकारी निधीच्या माध्यमातून सार्वजनिक कर्जाद्वारे किंवा जमा केलेल्या अतिरिक्त रकमेतून पैसे उभे करते. या बजेटमुळे सरकारकडून अधिक खर्च होतो आणि कर्ज वाढते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 30, 2022 7:30 PM IST