Top Recommended Stories

Budget 2022 : करदात्यांना नवीन आयकर प्रणालीत जाण्यासाठी मिळू शकते प्रोत्साहन

Budget 2022 : आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये करदात्यांना पर्यायी आयकर प्रणालीकडे वळविण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. बहुतांश करदाते आजही जुन्या रचनेनुसार आयकर भरत आहेत.

Published: January 31, 2022 3:30 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Budget 2022: Taxpayers Can Now File Updated Tax Return Within 2 Years From Relevant AY
Budget 2022: Taxpayers Can Now File Updated Tax Return Within 2 Years From Relevant AY

Budget 2022 : आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये करदात्यांना (Taxpayers) पर्यायी आयकर प्रणालीकडे (New Income Tax System) वळविण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. बहुतांश करदाते आजही जुन्या रचनेनुसार आयकर (income tax return) भरत आहेत. कारण नवीन पद्धतीच्या तुलनेत अनेक सवलती आणि फायदे यात मिळतात. नवे सरकार कॉर्पोरेट्ससाठी चांगले काम करत आहे. मात्र तोच परिणाम वैयक्तिक करदात्यांच्या बाबतीत दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

Also Read:

livemint.com च्या वृत्तानुसार वित्त मंत्रालय (Finance Ministry) या प्रकरणी चौकशी करत आहे आणि व्यक्तिगत करदात्यांना (Individual taxpayers) नवीन आयकर प्रणालीकडे वळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये कॉर्पोरेट्ससाठी कर दरात सवलत देत नवीन कंपन्यांना 15 टक्के आणि कार्यरत संस्थांसाठी 22 टक्के कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

You may like to read

याप्रमाणे व्यक्तिगत करदात्यांसाठी वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी वैकल्पिक आयकर संरचनेची घोषणा केली होती. नवीन आयकर प्रणाली अंतर्गत कराचे दर कमी करण्यात आले होते, परंतु ज्या व्यक्तींनी याचा पर्याय निवडला त्यांना भविष्य निर्वाह निधी, गृहकर्ज, जीवन विमा, वैद्यकीय विमा, मुलांसाठी शिक्षण शुल्क आणि बरेच काही यासारख्या सवलती सोडून द्याव्या लागल्या. नवीन व्यवस्था कमी कर दर देते. मात्र लोकांनी केलेल्या गुंतवणुकीसाठी सवलत दिली जात नाही. त्यामुळे अनेक करदाते अजूनही जुन्या आयकर प्रणालीला प्राधान्य देत आहेत.

कर व्यवस्थेसाठी सोपी योजना हवी
जाणकारांच्या म्हणण्यानुसार नवीन आयकर व्यवस्थेला सवलतीच्या कमतरतेमुळे प्रतिसाद मिळाला नाही. त्यामळे नव्या व्यवस्थेत सरकारने असे काही फायदे किंवा सवलतीचा समावेश केला पाहिजे जेणेकरून अधिकाधिक लोक सोप्या प्रणालीकडे वळतील.

लवकरच ‘उपयुक्त समाधान’ शक्य
livemint.com ने याबाबत ज्या लोकांकडून जाणून घेतले त्यातील एकाने म्हटले की नवीन व्यवस्थेत करदात्यांसमोर येणाऱ्या इश्यूवर काम सुरु आहे. नवीन कर प्रणालीला आकर्षक बनविण्यासाठी लवकरच ‘उपयुक्त समाधाना’ची घोषणा केली जाईल.

मूलभूत सूट मार्यादेत कपात
पर्यायी आयकर प्रणाली अंतर्गत काही सवलती लागू करण्याव्यतिरिक्त सरकार मूलभूत सूट मर्यादा किंवा मानक कमी करेल अशी शक्यता आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 31, 2022 3:30 PM IST