Top Recommended Stories

Budget 2022: अर्थसंकल्प तयार करणे का गरजेचा आहे?, काय आहे वित्तीय धोरण घ्या जाणून!

Budget 2022: केंद्रीय बजेटवरुन आपण सरकारचे कामकाज समजू शकतो. त्यासाठी आपल्याला केंद्रीय बजेट योग्य प्रकारे समजून घेणे गरजेचे आहे.

Updated: January 30, 2022 1:47 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Budget 2022 Expectations: Here Is What Income Tax Payers Want From Budget 2022
Budget Session 2022

Budget 2022 : भविष्य सुरक्षित (safe future) बनविण्यासह दीर्घकालीन (long term) ध्येय प्राप्त करण्यासाठी बजेट हे एक प्रभावी माध्यम आहे. कोणालाही माहीत नसते की, त्यांच्या जीवनात केव्हा काय घटना घडेल आणि अत्यावश्यक निधीची (Essential funds) कधी गरज भासेल. त्यानुसार बजेट तयार करणे फक्त एका व्यक्ती किंवा व्यापारी संघटनांसाठी गरजेचे नसून ते कोणत्याही देशाच्या सरकारसाठी (government) देखील आवश्यक आहे.

Also Read:

प्रत्येक सरकारच्या काही सामाजिक (social), राजकीय (political) आणि वित्तीय (financial) जबाबदाऱ्या असतात. विशेषतः भारतासारख्या देशासाठी हे महत्वाचे असून जनतेपासून जमा केलेल्या कररुपी धनाचा उपयोग सर्व जनतेच्या सामाजिक गरजा (the social needs of people) पूर्ण करण्यासाठी केला जातो. तसंच सर्वांना रोजगार (Employment) उपलब्ध करून दिला जातो. केंद्रीय बजेटवरुन आपण सरकारचे कामकाज समजू शकतो. त्यासाठी आपल्याला केंद्रीय बजेट योग्य प्रकारे समजून घेणे गरजेचे आहे. बजेट या शब्दाचा अर्थ म्हणजे ‘एका निर्धारित वेळेसाठी उत्पन्न आणि खर्चाचा अंदाज’ आणि एका क्रियेच्या स्वरूपात याचा अर्थ ‘बजेटमध्ये एका विशेष राशीला मान्यता देणे.’

You may like to read

काय आहे वित्तीय धोरण ( What is Financial policy) –

बजेट ही एक मसुदा योजना आहे. ज्याद्वारे सरकार (government) अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी कर महसूल आणि त्याच्या खर्चावर नियंत्रण ठरवते. वित्तीय धोरण खर्च आणि करदात्यांमधील समायोजनाचा संदर्भ देते. जे देशाच्या आर्थिक स्थितिचे निरीक्षण कारण्यासाठी प्रमुख साधन म्हणून काम करते.

एप्रिलपासून सुरु होतो आर्थिक वर्ष (Fiscal year starts from April) –

एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरु होणाऱ्या वर्षाला आर्थिक वर्ष (Financial year) म्हणतात. कोणत्याही कायद्याच्या किंवा विनिमयाच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या ‘प्रारंभ’ चा अर्थ म्हणजे ज्या दिवसी कायदा किंवा नियम अंमलात येईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 30, 2022 1:46 PM IST

Updated Date: January 30, 2022 1:47 PM IST