Top Recommended Stories

Budget 2022: 'वर्क फ्रॉम होम'मुळे अनेकांचे बजेट बिघडले! केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा

कोरोना महामारीमुळे जवळपास सर्वच क्षेत्र प्रभावित झाले आहेत. गेल्या लॉकडाऊनचा व्यावसायिक तसेच कर्मचारीवर्गाला देखील मोठा फटका बसला आहे.

Published: January 20, 2022 9:53 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Budget 2022: 'वर्क फ्रॉम होम'मुळे अनेकांचे बजेट बिघडले! केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा

Budget 2022: कोरोना महामारीमुळे (Covid-19) जवळपास सर्वच क्षेत्र प्रभावित झाले आहेत. गेल्या लॉकडाऊनचा (Lockdown in India) व्यावसायिक तसेच कर्मचारीवर्गाला देखील मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा (Corona Virus) वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सरकार तसेच खासगी संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या (Work From Home) सूचना दिल्या आहेत. आणि हीच बाब आता कर्मचाऱ्यांच्या खर्चात वाढ करणारी ठरली आहे. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे नोकरदारांचे आर्थिक बजेट बिघडले आहे.

Also Read:

घरी काम करावे लागत असल्याने संपूर्ण सेट-अप लावल्यामुळे वीज बिल, इंटरनेट, टेलिफोन बिलासह इतर अतिरिक्त खर्च वाढला आहे. अशातच स्वतः ला व कुटुंबाला कोरोनापासून वाचवत असताना वर्क फ्रॉम होममुळे अतिरिक्त खर्चाला सामोरे जावे लागत आहे. आर्थिक ताळमेळ बसवताना नोकरदारांची चांगलीच कसरत होत आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात सरकारकडून ‘वर्क फ्रॉम होम’ भत्ता 50 हजार रुपये, तसेच एक लाख रुपये प्रमाणित कपातीची अपेक्षा वेतनधारक कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

You may like to read

आगामी अर्थसंकल्पाकडून अपेक्षा…

कोविड- 19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्यात येत आहे. कर्मचारीवर्ग देखील सकारात्मकता दर्शवित काम करीत आहे. मात्र वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांच्या घरातील मासिक खर्चाचे गणित बिघडले आहे. वर्क फ्रॉम होमच्या सेट-अपमुळे वीजबिल, टेलिफोन बिल, इंटरनेट बिलासह फर्निचरचा खर्च वाढीस आला आहे. या सर्व बाबींचा विचार करता सरकारी आणि खासगी संस्थांनी कर्मचाऱ्यांना भत्ते देण्याची आवश्यकता आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकॉउंटेट्स ऑफ इंडियाने (ICAI) देखील सरकारला याबाबत सल्ला दिला आहे. त्यामुळे फर्निचर व अन्य सेट-अप खर्चात विशेष सूट देण्याची शक्यता आहे. यासह ICAI ने म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे संस्थांनी वर्क फ्रॉम होम सुरु केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांकडे वर्क फ्रॉम होमसाठी पर्याप्त साधन सामग्री नसल्याने संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सेटअप प्रदान केले पाहिजे, जेणेकरून कर्मचारी आपले काम वेळेत व प्रभावीपणे करू शकतील. यासह कारमध्ये सवलत देखील दिली गेली पाहिजे

एक लाख रुपये प्रमाणित कपातीची अपेक्षा…

वर्क फ्रॉम होमची परिस्थिती लक्षात घेता सरकारने प्राप्तीकर अधिनियम कलम 19 अनुसार प्रमाणित करातीची मर्यादा 50 हजाराहून 1 लाख रुपये करायला हवी. असे अनेक खर्च आहेत, जे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दरम्यान करावे लागतात. त्याचा दावा करणे शक्य होत नाही. त्यामुळे आयसीएआयने म्हटले आहे की, प्रमाणीत कपातीची मर्यादा किमान 1 लाखांपर्यंत वाढविली जाऊ शकते, त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकते, सरकार आता काय निर्णय येईल याकडे, सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 20, 2022 9:53 PM IST