नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (CBSE) आज, 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता 10 वीचा निकाल (CBSE Class 10th Result 2021) ऑनलाईन जाहीर केला. cbseresults.nic.in वर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थी या ठिकाणी आपला निकाल (CBSE Class 10th Result) पाहून डाऊनलोड देखील करू शकतात.Also Read - CBSE 10th Board Result 2021: आज जाहीर होऊ शकतो सीबीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल; असा पाहता येईल

सीबीएसईच्या वेबसाईटवर दिलेल्या 3 लिंकवर क्लिक करून विद्यार्थी त्यांचे स्कोअरकार्ड तपासू शकतात. निकालाच्या वेळी वेबसाईटवर जास्त ट्राफीक होते. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन निकालासाठी तीन लिंक कार्यान्वीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये cbse.gov.in, cbseresults.nic.in आणि DigiLocker ची वेबसाइट- digilocker.gov.in समावेश आहे. दरम्यान, सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी एक योजना बनवली आहे. याअंतर्गत एकापेक्षा अधिक परीक्षा घेण्यात येतील. तसेच या आधारे भविष्यात (CBSE 10th Board Result 2021) निकाल वेळेवर दिला जाऊ शकेल. Also Read - CBSE 12th Board Result 2021: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, इथे पहा निकाल!

सीबीएसई 10 वी बोर्डाचा निकाल कसा तपासावा?

-CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in भेट द्या.
-CBSE 10th Board Result 2021 असे लिहिलेले असलेलल्या लिंकवर क्लिक करा.
-आवश्यक ती माहिती प्रविष्ट करा.
-त्यानंतर तुमचा CBSE 10वी बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
-भविष्यातील संदर्भासाठी निकाल सेव्ह किंवा डाउनलोड करा. Also Read - CBSE 12th Board Result 2021: 12 वीचा निकाल जाहीर, विद्यार्थी 'या' ठिकाणी पाहू शकतात Result

त्याचबरोबर CBSE बोर्डाचा 10 वीचा निकाल (CBSE Board 10th, 12th Result 2021) पाहाण्यासाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in, cbse.gov.in वर देखील बघू शकतात. याशिवाय इतर डिजिटल प्लेटफॉर्म सारख्या डिजिलॉकर वेबसाइट digilocker.gov वर देखील निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोबतच निकाल SMS, IVRS आणि UMANG App वर देखील पाहाता येईल.

CBSE 10 वी बोर्ड परीक्षा 2021 चे मूल्यमापन हे 20 गुणांचे अंतर्गत मूल्यांकन आणि शाळांनी घेतलेल्या 80 गुणांच्या बाह्य मूल्यांकनावर आधारित आहे. याचा अर्थ असा की दहावीचा निकाल (CBSE 10th Board Result 2021) वर्षभरात शाळांनी घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे प्राप्त होईल.