CBSE 12th Board Result 2021: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, इथे पहा निकाल!

सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या निकालात यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे.

Published: July 30, 2021 3:07 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

CBSE Board 12th Result 2021
CBSE Board 12th Result 2021

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसई बोर्डाचा (CBSE) 12वीचा निकाल जाहीर झाला आहे. 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना हा निकाल CBSE च्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) आपला निकाल पाहाता येणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या निकालात (CBSE 12th Result) यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. 99.67 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 99.13 टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.

Also Read:

यावर्षी सीबीएसई बोर्डाच्या 12वी परीक्षेसाठी 14,30,188 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी रेग्युलर विद्यार्थ्यांची संख्या 13,04,561 असून त्याचा आज निकाल जाहीर झाला आहे. तर यापैकी12,96,318 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दिल्लीतील (Delhi) 2,91,606 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,91,135 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दिल्ली विभागात यावर्षी 99.84 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

देशभरात कोविड-19 च्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना रोल नंबरसोबत कोणतेही एडमिट कार्ड मिळू शकले नव्हते. त्यामुळे आता CBSE बोर्डने विद्यार्थ्यांना रोल नंबरपर्यंत पोहोचण्यासाठी एक ‘विंडो’ सक्रिय केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला 12 वीचा निकाल बघण्यासाठी (CBSE Board 10th, 12th Result 2021) आधी वेबसाइट cbse.gov.in वर लॉगइन करावं लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आवश्यक असेल.

असा पाहा निकाल –

– CBSE च्या अधिकृत वेबसाइटवर लॉगइन करा.
– CBSE 12th Board Result 2021 लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
– आपला रोल नंबर आणि आवश्यक माहिती भरा.
– तुमचा CBSE 12th Board Result 2021 स्क्रीनवर दिसेल. .
– तुम्ही निकाल डाऊनलोड करू शकतात.

याठिकाणी पाहू शकता निकाल –

त्याचबरोबर CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल (CBSE Board 10th, 12th Result 2021) पाहाण्यासाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in, cbse.gov.in वर देखील बघू शकतात. याशिवाय इतर डिजिटल प्लेटफॉर्म सारख्या डिजिलॉकर वेबसाइट digilocker.gov वर देखील निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोबतच निकाल SMS, IVRS आणि UMANG App वर देखील पाहाता येईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: July 30, 2021 3:07 PM IST