CBSE Board Exams 2022: सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीची आजपासून परीक्षा, काय आहे नियमावली?
CBSE Board Exams 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा (CBSE Term 2) आजपासून (26 एप्रिल) सुरू होत आहेत. CBSE Term 2 परीक्षेसाठी दरम्यान, सीबीएसई बोर्डाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.

CBSE Board Exams 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा (CBSE Term 2) आजपासून (26 एप्रिल) सुरू होत आहेत. परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने मार्गदर्शक सुचना (CBSE Exam Tips in Marathi) जारी केल्या आहेत. यंदा 10 वी आणि 12 वीची परीक्षा (CBSE Board Exam Guidelines) एकूण 34 लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी देणार आहेत. या परीक्षासाठी देशभरात एकूण 7412 परीक्षा केंद्रे असतील. विदेशात एकूण 133 केंद्रे असतील.
Also Read:
CBSE बोर्डाची 10 ची परीक्षा 24 मेपर्यंत तर 12 वीची परीक्षा 15 जूनपर्यंत असणार आहे. CBSE ची ही परीक्षा दोन तासांची परीक्षा असणार आहे. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 20 मिनिटे मिळणार आहेत. परीक्षा सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 दरम्यान घेतली जाणार आहे.
दरम्यान, देशभरात कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर CBSE ची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात येत आहे. पहिल्या दिवशी 10 वीचा चित्रकलेची परीक्षा होणार आहे. तर 12 वीची Vocational Subject ची परीक्षा होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 एप्रिलला इंग्रजीची परीक्षा होईल. 12 वीचे विद्यार्थी पहिल्या दिवशी Entrepreneurship & Beauty & Wellness विषयाची परीक्षा देतील तर 12 वीचा मुख्य परीक्षा 2 मेपासून सुरू होईल.
काय आहेत मार्गदर्शक सुचना…?
परीक्षा मंडळाने CBSE Term 2 साठी विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना या मार्गदर्शक सुचनांचे पालक करणे अनिवार्य आहे.
1. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हॉल तिकिट अनिवार्य करण्यात आले आहे. हॉल तिकिट आणि शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवावे.
2. विद्यार्थ्यांनी हॉल तिकिटवर नमूद केलेल्या सर्व सूचना अगोदर वाचून त्याचे पालन करावे.
3. कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे. अनेक राज्यांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे परीक्षा देताना प्रोटोकॉलचे पालन करणे अनिवार्य आहे.
4. विद्यार्थ्यांना मास्कचा वापर करावा लागणार आहे. तसेच सोशल डिस्टेंसिंगचे नियमांचे पालन कराले लागेल.
5. परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन, ब्लूटूथ किंवा इअरफोन सोबत नेऊ नये. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, परीक्षा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेच्या किमान एक तास आधी पोहोचावे.
CBSE टर्म 2 परीक्षेचे हॉल तिकिट असे डाउनलोड करा…
– CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या.
– होमपेजवर हॉल तिकिटच्या लिंकवर क्लिक करा.
– तुमची वैयक्तिक माहिती भरून सबमिट बटणावर क्लिक करा.
– होमपेजवर तुमचे हॉल तिकिट दिसेल. ते डाउनलोड करा.
– CBSE टर्म 2 परीक्षेच्या हॉल तिकीटची एक प्रिंटआउट काढून घ्या.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या