Top Recommended Stories

CBSE Class 10, 12 Term 1 result 2022: CBSE ने केला मोठा खुलासा! आज जाहीर होणार नाही निकाल

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. 10 वी आणि 12 वी टर्म-1 परीक्षा 2022 चा निकाल आज 24 जानेवारी 2022 रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, यासंदर्भात CBSE ने मोठा खुलासा केला आहे.

Updated: January 24, 2022 11:54 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

CBSE Class 12 exam, cbse class 12 physics term 2 exam, CBSE Class 12 Physics Term 2 Exam 2022, CBSE Class 12 Physics Term 2 Exam, cbse class 12 exam, cbse class 12 physics sample paper, cbse class 12 physics additional practice questions, CBSE Class 12 physics practice questions
The CBSE, however, is yet to make any official announcement on the weightage of the Term 1 and term 2 exams.

CBSE Class 10, 12 Board Exam 2022 Term 1 result: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. 10 वी आणि 12 वी टर्म-1 परीक्षा 2022 चा निकाल (CBSE Class 10, 12 Board Exam 2022) आज 24 जानेवारी 2022 रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, यासंदर्भात CBSE ने मोठा खुलासा केला आहे. आज निकाल जाहीर होणार नाही, असे CBSE ने जाहीर केले आहे. CBSE च्या अधिकृत संकेतस्थळ cbse.gov.in वर (CBSC Website) हा खुलासा करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील लाखों विद्यार्थी आपल्या स्कोरच्या (CBSE Class 10,12 term 1 scores) प्रतिक्षेत आहेत. आज निकाल (CBSE board exam 2022 term 1 results) जाहीर होणार असल्याची चर्चा होती. आता या चर्चेला तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

Also Read:

10 वी, 12 वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी CBSE ची वेबसाईट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वर आपला स्कोर चेक करू शकतात.

You may like to read

दरम्यान, CBSE कडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु CBSE बोर्ड परीक्षा 2022 टर्म-1 चा निकाल (CBSE board exam 2022 term 1 result) आज 24 जानेवारीला आपल्या वेबसाईटवर घोषित करण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर CBSE कडून माहिती देण्यात येईल. विद्यार्थी CBSEच्या वेबसाईटवर जाऊन स्कोर चेक करू शकतात, संबंधीत माहिती डाऊनलोड करू शकतात.

असा चेक करा स्कोर… (CBSE Class 10, 12 Board Exam 2022 Term 1 result)

1: CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या.
2: CBSE 10th Term 1 Result 2022 या CBSE 12th Result 2022 वर क्‍ल‍िक करा.
3: नवे पेज उघडेल. आपला रोल नंबर आणि जन्‍म तारखेसह इतर माहिती भरा.
4: यानंतर स्‍क्रीनवर 10 वी, 12 वीचा निकाल दिसेल.

महत्त्वाचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 10 वी आणि 12 वीची टर्म- 1 परीक्षा (CBSE Class 10 and 12 board exams 2022 term 1) दिली आहे, ते डिजिलॉकर (DigiLocker app) आणि उमंग ऐपवर (UMANG app) देखील आपल्या स्‍कोर चेक करू शकतात.

DigiLocker

यासाठी digilocker.gov.in वर भेट द्या. आपला रोल नंबर आणि जन्‍मतारीख देऊन मार्कशीट डाऊनलोड करता येईल. हे एक अॅप आहे. ते डाउनलोड करा आणि त्यात निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याला त्याचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागेल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 24, 2022 10:36 AM IST

Updated Date: January 24, 2022 11:54 AM IST