श्रीनगर: जम्मू-काश्मीरची (Jammu & Kashmir) राजधानी श्रीनगरमध्ये (Srinagar) शनिवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या (CRPF jawan) टीमवर ग्रेनेड हल्ला (Grenade Attack) केला. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV Footage कैद झाली आहे. ग्रेनेड हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांना लक्ष्य करत त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू (One person death) झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.Also Read - Viral Video : ...अन् बघता बघता दुचाकीस्वार पत्नीसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाला, सुदैवाने वाचला जीव!

Also Read - Pulwama Encounter: भारतीय लष्कराला मोठे यश; लश्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील बर्बरशाह (Barbar Shah in Srinagar) भागामध्ये शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला (grenade attack on CRPF party) केला. समोर आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहेत की, रस्त्याच्या कडेला ड्युटीवर तैनात असलेले जवान दिसत आहे. रस्त्यावरुन गाड्या जात आहे. त्यावेळी अचानक दहशतवादी (Terror attack) सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला करतात. सीसीटीव्हीत स्फोट झाल्याचे दिसत आहे. त्याठिकाणी उपस्थित असलेले जवान हातामध्ये शस्त्र घेऊन प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत दिसत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली दिसत आहे. Also Read - Viral Video: वरळी सी लिंकवर अपघाताचा थरार, टॅक्सीच्या धडकेत दोघांचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद!

ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफ (CRPF) जवान सुखरुप आहेत. पण या हल्ल्यात एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला. मुदासिर अहमद असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. या घटनेनंतर जवानांनी परिसराला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरु केले. पण हल्ला करणारे दहशतवादी फरार झाले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘श्रीनगरच्या क्रालखुड पोलिस (jammu & Kashmir police) ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बर्बरशाह परिसरात संध्याकाळी सहा वाजता दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिस दलाच्या टीमवर ग्रेनेड हल्ला केला.’