Top Recommended Stories

Central Bank of India 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 535 पदांसाठी बंपर भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे (Central Bank of India) 535 पदांसाठी भरती प्रक्रिया ( Recruitment)  राबविण्यात येत आहे. यासाठी बँकेने प्रादेशिक कार्यालय (Regional Office), विभागीय कार्यालय (Zonal Office) आणि केंद्रीय कार्यालय (Central Office) स्तरावरील पदांबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे.

Published: February 22, 2022 1:08 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Central Bank of India 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 535 पदांसाठी बंपर भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Central Bank of India 2022 : नोकरीच्या सोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून (Central Bank of India) 535 पदांसाठी भरती प्रक्रिया ( Recruitment)  राबविण्यात येत आहे. यासाठी बँकेने प्रादेशिक कार्यालय (Regional Office), विभागीय कार्यालय (Zonal Office) आणि केंद्रीय कार्यालय (Central Office) स्तरावरील पदांबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 28 फेब्रुवारी 2022 आहे. पात्र उमेदवारांनी आपल्या योग्यतेनुसार अर्ज करावा. चला तर मग जाणून घेऊया रिक्त पदांची संख्या व अर्ज प्रक्रिया…

Also Read:

रिक्त पदांचा तपशील

प्रादेशिक कार्यालय स्तर – 360
विभागीय कार्यालय स्तर – 108
केंद्रीय कार्यालय स्तर – 67
असे एकूण 535 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

You may like to read

आवश्यक पात्रता

 • या पदांसाठी जे अधिकारी सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून वयाच्या 60 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले आहे. तेच उमेदवार या पदासाठी पात्र असणार आहे.
 • बँकेच्या सेवेत असतांना अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीच्या 5 वर्षा आधी कुठल्याही प्रकारची शिक्षा किंवा दंड लावण्यात आलेला नसावा.
 • यासह उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या निरोगी असावा. ही योग्यता असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
 • यासह उमेदवाराचे वय 63 वर्षांपेक्षा जास्त नसावे. पात्र उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल.

असे आहे वेतनमान…

 • स्केल 1 – 40,000
 • स्केल 2 – 50,000
 •  स्केल 3 – 60,000
 • स्केल 4 –  70,000
 •  स्केल 5 – 80,000
 •  स्केल 6 – 90,000
 •  स्केल 7 – 100,000

असा करा अर्ज…

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ही भरती प्रक्रिया Application for Engaging of Retired Officers of Central Bank of India अंतर्गत होत आहे. अर्जासाठी उमेदवारांना 590 रुपये फी द्यावी लागणार आहे. यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नावाचा डिमांड ड्रॅफ मुबई येथे जमा करावा लागेल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 22, 2022 1:08 PM IST