नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (second Wave of corona) वेग मंदावत चालला असल्याचे म्हटले जात असले तरी सुद्धा कोरोनाची दुसरी लाट ही अद्याप संपली नसल्याचे (second wave of corona persists) केंद्र सरकारने (Central Government) स्पष्ट केले आहे. कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही त्यामुळे सर्व राज्यांनी लसीकरणावर (Vaccination) भर द्यावा आणि नियम-निर्बंधांचे पालन करावे असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. देशातील 16 राज्यांमधील 71 जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे. या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्गदर (Corona infection rate) 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे केंद्र सरकारने सांगितले.Also Read - Breaking News Live: काँग्रेस हायकमांडने नाही स्विकारला सिद्धू यांचा राजीनामा! प्रदेश काँग्रेसला दिले हे निर्देश

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल (Member of the Policy Commission Dr. VK Paul) यांनी सांगितलं की, ‘कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. 100 जिल्ह्यात आजही दिवसाला 100 रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रासारख्या (Maharashtra) मोठ्या राज्यांतील परिस्थिती अटोक्यात असली तरी सुद्धा केरळ, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा आणि मणिपूर या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट अजून संपली नाही त्यामुळे सर्व राज्यांनी दक्षता घ्यायला हवी.’ तसंच, कोरोनाचे संक्रमण कोणत्याही राज्य आणि जिल्ह्यातून पूर्ण देशात होऊ शकते. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण पूर्ण देशातून संपेपर्यंत आपण सुरक्षित नाही’, असे त्यांनी सांगितले. Also Read - Sukanya Samriddhi Yojana: फक्त 8 ते 10 रुपये गुंतवणूक करून उज्ज्वल करा मुलीचं भविष्य

कोरोनाची तिसरी लाट (third Wave of corona) येणं न येणं हे आपल्या हातात आहे. जर आपण शिस्त पाळली, दृढनिश्चय केला तर तिसरी लाट येणार नाही, असं देखील डॉ. पॉल यांनी सांगितलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, ‘आंध्रप्रदेशमध्ये 9, अरुणाचल प्रदेशमध्ये 13, मणिपूरमध्ये 7, मेघालयमध्ये 8, राजस्थानमध्ये 10 जिल्ह्यात कोरोनाचा संक्रमण दर जास्त आहे.’ दरम्यान, देशामध्ये 24 तासांत 46,617 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24 तासांत 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 4 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. Also Read - 11th Admission 2021: 11वीला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी विशेष संधी मिळणार!