Top Recommended Stories

Chankya Niti: या एका गोष्टीमुळं व्यक्ती नेहमी होते नेहमी अपयशी, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

Chankya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीती शास्त्रामध्ये जीवनातील प्रत्येक परिस्थितीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी पाळण्यास कोणतीही व्यक्ती कठीण प्रसंगातून देखील मार्ग काढू शकते. तसेच यशस्वी आणि सुखीआयुष्य जगू शकते.

Published: January 26, 2022 10:40 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Chankya Niti: या एका गोष्टीमुळं व्यक्ती नेहमी होते नेहमी अपयशी, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

Chankya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीती (Chankya Strategy) शास्त्रामध्ये जीवनातील प्रत्येक परिस्थितीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी पाळण्यास कोणतीही व्यक्ती कठीण प्रसंगातून देखील मार्ग काढू शकते. तसेच यशस्वी आणि सुखीआयुष्य जगू (Chankya Niti) शकते. कौटिल्य या नावाने प्रसिद्ध असलेल्या आचार्य चाणक्य यांनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्यला (Chandragupta Maurya) मगधचा सम्राट (Maurya Empire) बनवले होते. अशा या महान गुरू आचार्य चाणक्यांचे धोरणे आणि निधी आजच्या काळात देखील अतिशय उपयुक्त माणले जाते. आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या अपयशाचे कारण स्पष्ट केले आहे. जणून घेऊया काय आहे ते कारण…

Also Read:

अपयशासाठी कारणीभूत आहे या गोष्टी
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नितीनुसार माणसाने आयुष्यात नेहमी सकारात्मक दृष्टीकोण (Positive attitude) ठेऊन पुढे गेले पाहिजे. जीवनात कोणतेही संकट आले तरी त्यावर समाधान शोधले पाहिजे. कोणत्याही संकटाला न घाबरता त्याच्याशी धीरपणे लढले पाहिजे. चाणक्य नीतीनुसार (Chankya Niti) एखाद्या कामात अपयशी झाल्यामुळे माणसाचा पराभव होत नाही, तर तो संकटासमोर जेव्हा गुडघे टेकतो तेव्हा त्याचा खरा पराभव होतो. संकट कितीही मोठे असेल तरी त्यावर मात करण्याचा कोणता ना कोणता मार्ग असतोच. त्यामुळे कधी हार न मानता सतत प्रयत्न केले करणे गरजेचे असते. सकारात्मक दृष्टिकोण ठेवून प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळेल असे चाणक्य नीती सांगते.

You may like to read

संयम बाळगून रणनीती ठरवा
चाणक्य नीती सांगते की एखाद्या व्यक्तीने धीर सोडला नाही तर तो जिंकण्याच्या रणनीतीवर काम करू शकतो आणि जिंकू शकतो. संयम बाळगून सर्व बाजूंनी विचार करून बनविलेली रणनीती नेहमी यश मिळवून देते. त्याचप्रमाणे कोणी संकटात सापडले तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत राहावे. तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 26, 2022 10:40 PM IST