मुंबई : हिंदू धर्मात चातुर्मास (Chaturmas 2021 Date) सुरू झाल्यावर शुभ कार्ये थांबवले जातात. चातुर्मास (Chaturmas 2021 Date) दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीपर्यंत असतो.Also Read - Kharmas 2021 Date: या दिवसापासून सुरू होतोय 'खरमास', महिनाभर थांबणार शुभ कार्य

चातुर्मास 2021 (Chaturmas 2021 Date)

या वर्षी चातुर्मास 20 जुलै 2021 पासून सुरू होत असून 14 नोव्हेंबर 2021 रोजी समाप्त होईल. Also Read - Chaturmas Starting From Today: आजपासून चातुर्मास प्रारंभ; जाणून घ्या काय आहे मान्यता

चातुर्मासाबद्दल काय आहे मान्यता?

अशी मान्यता आहे की चातुर्मासाच्या या चार महिन्यांत भगवान विष्णू झोपले असतात. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. तो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीपर्यंत म्हजेच देवउठनी एकादशीला संपतो. या चार महिन्यांत कोणतेही शुभ कार्ये केले जात नाहीत. Also Read - Devashyani Ekadashi Importance: आजपासून थांबतील सर्व शुभ कार्ये; जाणून घ्या देवशयनी एकादशीचे महत्त्व

शुभ कार्ये का थांबतात

हिंदु धर्मात भगवान विष्णूला पालनहार म्हटले जाते. चतुर्मासात श्री हरि झोपलेले असल्याने लग्न, मुंडन इत्यादी शुभ कार्ये केली जात नाहीत. शुभ कार्यांमध्ये भगवान विष्णूचे आव्हान केले जाते, परंतु ते निद्रेत असल्यामुळे या कार्यात उपस्थित राहू शकत नाही. म्हणूनच चातुर्मासात शुभ कार्ये केले जात नाहीत. याशिवाय निसर्गात या चार महिन्यांत सूर्य, चंद्र आणि निसर्गाचं तेज कमी राहते. या काळात शुभ शक्ती कमकुवत असतात. त्यामुळे केलेल्या कार्याचे परिणाम देखील शुभ प्राप्त होत नाहीत. म्हणूनच या चार महिन्यांत म्हणजेच चातुर्मासात संत आणि महात्मे एकाच ठिकाणी राहतात आणि जप, तपश्चर्या व पूजा अर्चना करतात. असे मानले जाते की चातुर्मासात सर्व धाम ब्रज येथे येतात. त्यामुळे या काळात ब्रज यात्रा खूप शुभ माणली जाते.

चातुर्मास कोणते चार महिने येतात?

चातुर्मासचा पहिला महिना श्रावण असतो. दुसरा महिना भाद्रपद, चातुर्मासचा तिसरा महिना अश्विन असतो तर चौथा आणि शेवटचा महिना कार्तिक असतो. चातुर्मासात अनेक सण साजरे केले जातात. यामध्ये गणेश चतुर्थी, कृष्णा जन्माष्टमी, नवरात्र, दसरा, दिवाळी हे मुख्य सण आहेत.