Top Recommended Stories

Check Name In Voter List: मतदान यादीत असं शोधा तुमचं नाव, ही सोप्पी प्रक्रिया करा फॉलो

देशात आणि राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी तुमचं नाव मतदान यादीत असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.

Published: January 22, 2022 8:40 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Check Name In Voter List: मतदान यादीत असं शोधा तुमचं नाव, ही सोप्पी प्रक्रिया करा फॉलो
Check Name In Voter List Find Your Name In Voter List, Follow This Simple Process

How To Check Name In Voter List: देशात आणि राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क (Right of Vote) बजाविण्यासाठी तुमचं नाव मतदान यादीत (Voter List) असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळं मतदान यादीत आपलं नाव आहे की नाही? याची खात्री तुम्ही कुठेही बाहेर न जाता घर बसल्या ऑनलाईन (Online Electoral Role) करू शकता. मदतान यादीतील तुमचं नाव तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तपासू (Check Name In Voter List) शकता. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. जाणून घेऊया मतदान यादीत नाव (Name In Voter List) कसं शोधावं….

मतदान यादीत असं तपासा आपलं नाव?

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://nvsp.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • होमपेजवर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी “Electoral Role”वर क्लिक करा.
  • एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल. यात तुम्ही तुमच्या मतदान कार्डावरील माहिती भरा.
  • यामध्ये तुम्हाला नाव, वय, जन्म तारीख, लिंग, राज्य आणि जिल्हा अशी माहिती भरावी लागेल
  • त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड इंटर करा आणि Search पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला एक लिंक मिळेल ज्यात EPIC Number, राज्य आणि कॅप्चा कोड भरा.
  • यानंतर एक नवा टॅब ओपन होईल आणि तुम्ही मतदान यादीत आपलं नाव आहे की नाही हे पाहू शकता.

एसएमएसद्वारे असं चेक करा मतदान यादीत नाव?

  • यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलवरूनच एक टेक्स मेसेज करावा लागेल
  • मेसेजमध्ये EPIC टाईप करा आणि सोबत मतदान कार्डाचा नंबर टाका.
  • त्यानंतर हा मेसेज 9211728082 किंवा 1950 या नंबरवर पाठवा.
  • यानंतर तुमच्या मोबाईलवर एका मेसेज येईल, त्यात तुमचा पोलिंग नंबर आणि नाव असेल.
  • तुमचं नाव मतदान यादीत नसेल तर तुम्हाला कुठलीच माहिती प्राप्त होणार नाही.

You may like to read

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.