Top Recommended Stories

Children's Vaccination : मोठी बातमी! देशात मार्च महिन्यापासून सुरू होणार 12 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वेगाने फैलाव सुरू झाला आहे. देशात दैनंदिन रुग्णसंख्येत वेगाना वाढ झाली आहे. सध्या दररोज सुमारे 2.50 लाख प्रकरणांची नोंद केली जात आहे. अशा परिस्थित कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत.

Published: January 17, 2022 7:21 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Children's Vaccination : मोठी बातमी! देशात मार्च महिन्यापासून सुरू होणार 12 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण
Image for representational purposes only

Vaccination For children: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) वेगाने फैलाव सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दैनंदिन रुग्णसंख्येत वेगाना वाढ झाली आहे. भारतात सध्या दररोज सुमारे 2.50 लाख प्रकरणांची (Covid-19) नोंद केली जात आहे. अशा परिस्थित कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध (Covid Restriction) लादले आहेत. तसेच लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे. देशात सध्या 15 वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण (Covid Vaccine Update) केले जात आहे. या महिन्याच्या 3 तारखेपासून 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण (Child Vaccination) मोहीम सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान आणखी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. देशात मार्च महिन्यापासून 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांनाही कोविड लसीकरण सुरू केले जाऊ शकते. लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपचे (NTAGI) प्रमुख एनके अरोरा (NK Arora) यांनी याबाबत माहिती दिली.

NTAGI प्रमुख डॉ. एनके अरोरा म्हणाले की “15-18 वयोगटातील अंदाजे 7.4 कोटी (7,40,57,000) लोकसंख्येपैकी 3.45 कोटींहून अधिक लोकांना आतापर्यंत कोवॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यांना 28 दिवसांत दुसरा डोस द्यायचा आहे. या वयोगटातील किशोरवयीन मुले लसीकरण प्रक्रियेत उत्साहाने सहभागी होत आहेत आणि लसीकरणाचा हा वेग पाहता 15-18 वयोगटातील उर्वरित लाभार्थ्यांना जानेवारीच्या अखेरीस पहिला डोस मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांचा दुसरा डोस फेब्रुवारीअखेर देणे अपेक्षित आहे”.

You may like to read

अरोरा म्हणाले की “15-18 वर्षे वयोगटातील लसीकरण झाल्यानंतर 12-14 वर्षे वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी सरकार मार्चमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊ शकते. या वयोगटातील लोकसंख्या 7.5 कोटी आहे. (Vaccination of children from 12 to 14 years will start from March)

सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या लसीकरण अहवालानुसार 24 तासांत 39 लाखांहून अधिक डोस देण्यात आले असून एकूण संख्या 157.20 कोटींहून अधिक झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार 15-18 वयोगटातील मुलांना आतापर्यंत 3.45 कोटींहून अधिक पहिले डोस देण्यात आले आहेत. भारतात कोविड लसीकरण मोहीम गेल्या वर्षी 16 जानेवारीला सुरू झाली.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.