CISF Jobs 2022: संरक्षण दलात भरती होण्याची सुवर्ण संधी, सीआयएसएफमध्ये 1149 जागांवर मेगाभरती
CISF Recruitment 2022: कॉन्स्टेबल पदांसाठी सीआयएसएफ भर्ती जाहीर करण्यात आली आहे. सीआयएसएफ कॉन्स्टेबल (फायरमन) पदांसाठी अधिसूचना अधिकृत वेबसाइट www.cisfrectt.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

CISF Recruitment 2022: कॉन्स्टेबल पदांसाठी सीआयएसएफ भर्ती (CISF Recruitment 2022) जाहीर करण्यात आली आहे. सीआयएसएफ कॉन्स्टेबल (फायरमन) पदांसाठी (CISF Constable /Fireman Vacancy 2022) अधिसूचना अधिकृत वेबसाइट www.cisfrectt.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संरक्षण दलात भरती होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. CISF च्या कॉन्स्टेबल/फायर पदांसाठी 1149 जागांवर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या भरतीसंदर्भात जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 29 जानेवारी 2022 रोजी ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली होती.
Also Read:
उमेदवार अर्ज करण्यासाठी www.cisfrectt.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन CISF कॉन्स्टेबल जॉब्ससाठी (CISF Constable Jobs 2022) ऑनलाइन अर्ज करू शकतात. CISF कॉन्स्टेबल भरतीची (CISF Constable Bharti) अंतिम तारीख 04 मार्च 2022 आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स फायरमन कॉन्स्टेबलच्या भरतीची अधिसूचना (Central Industrial Security Force Fireman Constable Vacancy Notification) वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
CISF Bharti 2022: रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव: कॉन्स्टेबल/फायरमन
एकूण पदांची संख्या : 1149
अर्ज कसा सबमिट करायचा: फक्त ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2022
वेबसाइट : www.cisfrectt.in
CISF Bharti 2022: आवश्यक पात्रता
शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळातून विज्ञान शाखेत 12वी उत्तीर्ण असावा.
CISF Bharti 2022: वयोमर्यादा
CISF कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेला (म्हणजे 04/03/2022) अर्जदारांचे वय 18-23 वर्षे असले पाहिजे. उमेदवारांचा जन्म 05/03/1999 पूर्वी झालेला नसावा आणि 04/03/2004 नंतर झालेला नसावा.
वियोमर्यादेत सवलत
SC/ST: 5 वर्षे
OBC: 3 वर्षे
एक्स सर्विसमन : 3 वर्षे
गुजरातमधील 1984 च्या दंगली किंवा 2002 च्या जातीय दंगलीत मारल्या गेलेल्या पीडितांची मुले आणि आश्रित:
UR : 5 वर्षे
OBC : 8 वर्षे
SC/ST : 10 वर्षे
CISF Recruitment 2022: अर्ज शुल्क
CISF कॉन्स्टेबल जॉब्ससाठी (CISF Constable Jobs 2022) अर्ज करण्यासाठी सामान्य / OBC / EWS श्रेणीतील अर्जदारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC / STESM श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अर्जाची फी ऑनलाइन भरता येईल.
CISF Bharti 2022: निवड प्रक्रिया
पदांवरील निवड प्रक्रियेत (CISF Constable Fireman Recruitment 2022) खालील टप्प्यांचा समावेश असेल.
शारीरिक क्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST)
लेखी परीक्षा
डॉक्यूमेन्ट व्हेरिफिकेशन
मेडिकल टेस्ट
CISF Constable/Fire Jobs 2022: असा करा अर्ज
तुम्हाला या पदांसाठी (CISF Constable Recruitment 2022) अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज ऑनलाइन फॉर्म भरून भरू करू शकता.
1. CISF ची अधिकृत वेबसाइट www.cisfrectt.in ला भेट द्या
2. मुख्यपृष्ठावर दिलेली भरती अधिसूचना डाउनलोड करा.
3. त्यानंतर अर्ज ऑनलाइन लिंकवर क्लिक करा.
4. आवश्यक तपशील भरा आणि स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा.
5. यानंतर ऑनलाइन अर्जाची फी भरा.
6. अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या