CNG-PNG Price Hike: भडका सुरुच! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या नव्या किमती
आता पेट्रोल-डिझेल नाही तर सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

CNG-PNG Price Hike: सततच्या महागाईमुळे (inflation) सर्वसामान्य जनता खूप त्रस्त झाली आहे. या नाही तर त्या वस्तूंच्या किमतीत सतत वाढ होत आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) स्थिर आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना टेन्शन नव्हते. पण आता पेट्रोल-डिझेल नाही तर सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा (CNG-PNG Price Hike) वाढ झाली आहे. पाईपलाईनद्वारे घरोघरी पोहचणाऱ्या एलपीजी (LPG) आणि वाहन इंधन सीएनजीच्या किमतीत (CNG Price) पुन्हा एकदा वाढ झाली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे.
Also Read:
महानगर गॅस लिमिटेडने (MGL- Mahanagar Gas Limited) शनिवारी मध्यरात्रीपासून CNG आणि PNG च्या दरात वाढ केली आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनसाठी (MMR) CNGची किंमत 2.50 रुपये प्रति किलो आणि घरगुती PNGची किंमत 1.50 रुपये प्रती scmने वाढवण्यात आली आहे. तीन आठवड्यांपूर्वीच कंपनीने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवल्या होत्या. कंपनीने गेल्या महिन्यात म्हणजे 18 डिसेंबर 2021 रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर ताण आला आहे.
एमजीएलच्या प्रवक्त्याने (MGL Spokeperson) शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता सीएनजी 63.50 रुपये प्रती किलोवरून 66 रुपये प्रती किलो झाला आहे. पीएनजीच्या किमतीत वाढ झाल्यानंतर पीएनजी 38 रुपये एससीएमवरून 39.50 रुपये एससीएम झाला आहे. बाजारभावापेक्षा नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) किमतीत जास्त वाढ झाल्यामुळे MGLच्या इनपुट गॅसच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम महानगरातील आठ लाख ग्राहकांवर झाला आहे. आधीच महागाईमुळे मेटाकुटीला आलेल्या ग्राहकांना आता पुन्हा जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या