Top Recommended Stories

आनंदाची बातमी! 12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, Corbevax लसीच्या वापराला DCGIने दिली मान्यता!

Corbevax Vaccine : हैदराबादच्या 'बायोलॉजिकल ई' कंपनीने 'कॉर्बेवॅक्स' या लसीची निर्मिती केली आहे. या लसीला औषध नियामक प्रशासनाने सोमवारी आपत्कालीन वापरला मान्यता दिली आहे.

Updated: February 21, 2022 8:49 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Corbevax Vaccine
Corbevax Vaccine

Corbevax Vaccine : कोरोना विषाणूने (Corona Virus) गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहे. कोरोची पहिली लाटेपासून (First Wave Of Corona) ते तिसऱ्या लाटेपर्यंत (Third Wave Of Corona) लागण होणाऱ्यांची संख्या आणि मृतांचा आकड्याने उच्चांक गाठला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनापासून (Covid 19) बचाव करण्यासाठी सरकारने जोरदार लसीकरण (Corona Vaccination) मोहीम राबवली त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. पण या कोरोनाच्या विळख्यात लहान मुलं देखील सापडत आहेत. अशामध्ये आता 12 वर्षांवरील मुलांना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Also Read:

You may like to read

12 वर्षांवरील मुलांसाठीच्या Corbevax या लसीच्या आपत्कालीन वापराला सरकारने मान्यता दिली आहे. हैदराबादच्या ‘बायोलॉजिकल ई’ (Biological E) कंपनीने ‘कॉर्बेवॅक्स’ (Corbevax) या लसीची निर्मिती केली आहे. या लसीला औषध नियामक प्रशासनाने (DCGI) सोमवारी आपत्कालीन वापरला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता भारतातील लसीकरणाला आणखी वेग मिळणार आहे. याआधी भारतात 15 वर्षांवरील मुलांना लस दिली जात होती. आता 12 वर्षांवरील मुलांना देखील लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Corbevax ही भारतात विकसित झालेली तिसरी लस आहे.

दरम्यान, जानेवारी 2022 मध्ये 15 वर्षांवरील मुलांसाठी लसीकरण सुरु झाले होते. आता 12 वर्षांवरील मुलांसाठीच्या लसीकरणाचा (Vaccination) मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी 12 वर्षांवरील शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरणाचा मार्ग मोकळा होईल. आतापर्यंत भारतात फायझर, मोडर्ना, कोविशिल्ड, स्पुतनिक व्ही, कोवॅक्सिन या लसींना मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आता कार्बेवॅक्स लस लवकरच बाजारात येणार आहे. कोरोनाच्या इतर लसींप्रमाणेच कॉर्बेवॅक्सचे दोन डोस घ्यावे लागतील. मात्र ही लस स्वस्तात उपलब्ध होणार आहे. कार्बेवॅक्स ही लस तयार करण्यासाठी 50 रुपयांपर्यंत खर्च आहे. पण ही लस बाजारात 250 रुपयांत उपलब्ध होईल. बायोलॉजिकल ई कंपनीने सांगितले की, लसीपासून नफा मिळवणे हे त्यांचे लक्ष्य नाही, तर लोकांची सेवा करणे हे आहे. यामुळे, इतर लसींच्या तुलनेत त्याचे दर कमी ठेवले गेले आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 21, 2022 8:48 PM IST

Updated Date: February 21, 2022 8:49 PM IST