Corona Affects Mens Private Part: धक्कादायक! पुरुषांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर होतोय कोरोनाचा परिणाम, अमेरिकेतील तरुणाने शेअर केला अनुभव

Corona Affects Mens Private Part: कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रायव्हेट पार्टचा आकार पूर्वीपेक्षा लहान झाला असल्याचा दावा या तरुणाने केला आहे.

Updated: January 13, 2022 1:03 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

corona affects mens private parts
corona affects mens private parts

Corona Affects Mens Private Part: दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाची (Corona Virus) भीती अद्याप कायम आहे. या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाशी (Covid- 19) दोन हात करत आहे. कोरोनाची वेगवेगळे भयंकर व्हेरिएंट (Corona Variant) समोर येत आहेत. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटचे विविध लक्षणं आणि दुष्परिणामांबद्दल आपल्याला माहिती आहे. बरीच लक्षणं (Corona Symptoms) व्हेरिएंटनुसार बदलली सुद्धा आहेत. कोरोनाच्या या लक्षणांपासून आपण वेळोवेळी सावध देखील झालो. खबरदारी घेत योग्यवेळी उपचार देखील केले. पण या दरम्यान अमेरिकेतील (America) एका व्यक्तीने कोरोनाच्या संदर्भात केलेल्या दाव्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर या व्यक्तीच्या प्रायव्हेय पार्टवर परीणाम झाला (Corona Affects Mens Private Part) असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. अशाप्रकारची घटना पहिल्यांदाच समोर आली आहे त्यामुळे सर्वजण यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Also Read:

‘मिरर’ने दिलेल्या वत्तानुसार, पॉडकास्टवर (podcasts) या व्यक्तीने त्याला कोरोना झाल्यानंतरचा अनुभव शेअर केला आहे. यामध्ये या व्यक्तीने दावा केला आहे की, ‘कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचा परिणाम त्याच्या प्रायव्हेट पार्टवर झाला.’ या व्यक्तीने अतिशय सविस्तरपणे आपला अनुभव शेअर करत सांगितले की, ‘मी 30 वर्षांचा असून गेल्या वर्षी जुलैमध्ये मला कोरोनाची लागण झाली होती. उपचारा घेतल्यानंतर मला रुग्णालयातून सोडण्यात आले. यानंतर मला समजले की माझा प्रायव्हेट पार्टचा आकार पूर्वीपेक्षा लहान झाला आहे. कोरोनातून बरं झाल्यानंतर मला इरेक्टाइल डिसफंक्शनलाही सामोरे जावे लागले. दरम्यान हा त्रास औषधांनी बरा झाला पण ही नवीन समस्या निर्माण झाली आहे.’

या व्यक्तीने पुढे सांगितलं की, ‘संसर्ग होण्यापूर्वी माझ्या प्रायव्हेट पार्टचा आकार सामान्य (size of the private part is normal) होता. पण आता पूर्वीच्या तुलनेत त्याचा आकार छोटा झाल्याचे मला दिसले. हे व्हॅस्क्युलर डॅमेजमुळे (Vascular damage) झाले असावे. माझ्या डॉक्टरांनी याबद्दल सांगितलं की ही समस्या कायम राहील.’ तर अमेरिकेतील यूरोलॉजिस्ट ऍशले विंटर पॉडकास्टवर बोलताना म्हणाले की, ‘इरेक्टाइल डिसफंक्शनमध्ये (Erectile dysfunction) संबंधित व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट स्ट्रेच होत नाही. खरं तर जेव्हा एखादी व्यक्ती उत्तेजित असते तेव्हा त्याचा मेंदू त्याच्या प्रायव्हेट पार्टच्या नसांना सिग्नल पाठवतो ज्यामुळे त्याठिकाणी रक्तप्रवाह वाढतो. परंतु ज्यावेळी असं होत नाही तेव्हा ते स्ट्रेच होत नाही आणि परिणामी व्हायव्हेट पार्ट लहान होऊ शकतो.’

दरम्यान, डॉ विंटर यांनी याविषयी सांगितले की,’ हा एक दुर्मिळ प्रकारचा कोरोनाचा दुष्परिणाम आहे. ज्यामुळे प्रायव्हेट पार्टमधील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. यानंतर व्यक्तीला इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते.’ तसंच, डॉ विंटर यांनी एका यूरोलॉजिस्टच्या अभ्यासाची माहिती देताना सांगितले की, ‘कोरोनातून पूर्णपणे बरं झालेल्या दोन पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये व्हायरसचे ट्रेसेस सापडले आहेत. ज्यामुळे त्यांच्या खासगी जीवनावर (private life) परिणाम झाला आहे. नंतर त्यांच्यावर इम्प्लांट सर्जरी (Implant surgery) करावी लागली.’

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 13, 2022 12:46 PM IST

Updated Date: January 13, 2022 1:03 PM IST