नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Corona) अद्याप ओसरली नाही. त्यात तिसरी लाट (Third Wave of Corona) येण्याची भीती आहे. अशामध्ये देशातील कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) आकड्यामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा (Covid-19) वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारकडून (Central Government) लसीकरण मोहीम (Vaccination) वेगाने राबवली जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत देशातील 80 कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) घेतली आहे. आता राहिला प्रश्न लहान मुलांचा तर 12 ते 17 वयोगटातील मुलांना देखील कोरोना प्रतिबंधक लस लवकर देण्यात येणार आहे. याबाबत केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.Also Read - Mumbai Local Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

1 ऑक्टोबरपासून 12 ते 17 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याची घोषणा केंद्र सरकार लवकर करेल असे सांगितले जात आहे. देशामध्ये 18 वर्षांखालील मुलांची संख्या जवळपास 44 कोटी एवढी आहे. त्यामधील 12 ते 17 वयोगटातील मुलांना प्राधान्याने लस देण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. इन्सॅकॉग आणि कोविड टास्क फोर्सचे (Covid Task Force) अध्यक्ष प्रा. एन. के अरोरा यांनी याबद्दल सांगितले की, ‘या वयोगटातील मुलांद्वारे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांना प्राधान्याने लस दिली जाईल. लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग फारसा झाला नसल्याचे आतापर्यंतच्या सिरो सर्व्हेमधून (CIRO survey) आढळून आले आहे. प्रौढांनंतर आता 12 ते 17 वयोगटातील मुलांना आधी लस देण्याचे आमचे प्रयत्न आहेत.’ Also Read - Mumbai Local Update: 28 ऑक्टोबरपासून मुंबईची लाईफलाईन पूर्ण क्षमतेने धावणार, मध्य-पश्चिम रेल्वेवर 100 टक्के लोकल फेऱ्या!

दरम्यान, आपल्या देशामध्ये 12 ते 17 वयोगटातील जवळपास 12 कोटी मुलं आहेत. त्यामधील एक टक्का मुलांना इतर व्याधी आहेत. ही संख्या जवळपास 40 लाख असावी. या 12 ते 17 वयोगटातील मुलांना येत्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मोफत लस (free Vaccine) देण्यास सुरुवात होईल. औषध महानियंत्रकांनी झायडस कॅडिलाच्या झायकोव-डी लसीच्या आपत्कालीन वापराला 20 ऑगस्ट रोजी परवानगी दिली आहे. 12 वर्षांवरील मुलांना दिली जाणारी ही कोरोना प्रतिबंधक पहिली लस असणार आहे. Also Read - Breaking News Live Updates: NCBच्या बॉलिवूडवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार : नवाब मलिक