Top Recommended Stories

मोठी बातमी! Covishield आणि Covaxin बाजारात उपलब्ध होणार, DCGIने बाजारात विक्रीची दिली परवानगी

Corona Vaccine : दोन्ही लस डायरेक्ट मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार नाहीत. फक्त हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स या लस खरेदी करु शकणार आहेत.

Updated: January 27, 2022 5:02 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Covaxin and Covishield
Covaxin and Covishield

Corona Vaccine : कोरोनाच्या पहिल्या (First Wave of Corona), दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Corona) आणि आता तिसऱ्या लाटेचा (Third Wave of Corona) प्रसार रोखण्यासाठी कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन्ही कोरोना प्रतिबंधक (Corona Vaccine) लसी प्रभावी ठरल्या आहेत. या लसींबाबत ड्रग्ड कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) महत्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच भारताच्या (India) या दोन महत्वाच्या आणि कोरोना विरोधी लस बाजारात (Corona Vaccine Available in Market) उपलब्ध होणार आहेत. डीसीजीआयने या दोन्ही कोरोना प्रतिबंधक लसीच्या बाजारातील विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. असे असले तरी सुद्धा या दोन्ही लस डायरेक्ट मेडिकल स्टोअर्समध्ये (Medical Store) उपलब्ध होणार नाहीत. फक्त हॉस्पिटल्स (Hospitals) आणि क्लिनिक्स (Clinic) या दोन्ही लस खरेदी करु शकणार आहेत.

You may like to read

कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लस यापुढे हॉस्पिटल आणि क्लिनिक्समध्ये उपलब्ध होणार आहेत. खरेदी करण्यात येणाऱ्या लसींचा सूंपूर्ण डेटा संबंधित खरेदीदारांना डीसीजीआयकडे दर सहा महिन्यांनी सुपूर्त करावा लागणार आहे. तसंच हा डेटा कोविन अ‍ॅपवर (Covin App) देखील अपडेट करावा लागणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या फॅमिली डॉक्टर किंवा नजीकच्या हॉस्पिटलमध्ये लस मिळणार आहे. यामुळे आता सरकारी लसीकरण केंद्रावरील (Vaccination Center) ताण कमी होईल आणि जास्तीत जास्त नागरिकांना लवकरात लवकर लस मिळण्यास मदत होईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविशिल्ड आणि कोव्हॉक्सिन या दोन्ही लसी दुकानात उपलब्ध होणार नाहीत. फक्त खासगी हॉस्पिटल्स (Private Hospital) आणि क्लिनिक्स (Clinics) ही लस खरेदी करू शकतील आणि त्या तिथेच टोचल्या जातील. नवीन औषधे आणि क्लिनिकल चाचण्या नियम, 2019 (Rules for new drugs and clinical trials, 2019) अंतर्गत ही मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, यूएसमधील फायझर आणि यूकेमधील अ‍ॅस्ट्राझेनेका यांना सशर्त बाजार मान्यता देण्यात आली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.