Top Recommended Stories

Corona Vaccine for Children: आनंदवार्ता! 7 ते 11 वयोगटातील मुलांचे लवकरच लसीकरण, या लसीच्या वापराला मिळाली मंजुरी

Corona Vaccine for Children: सरकारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लस मंजूर केली आहे. या वयोगटातील मुलांना ही लस (Corona Vaccine for Children) येत्या काही दिवसांत मिळू शकते.

Published: June 25, 2022 2:46 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Corona Vaccine for Children: आनंदवार्ता! 7 ते 11 वयोगटातील मुलांचे लवकरच लसीकरण, या लसीच्या वापराला मिळाली मंजुरी
Corona Vaccine For Children

Corona Vaccine for Children: देशावर असलेले कोरोनाचे (Corona Virus) संकट अद्याप संपले नाही. कोरोनाने (Covid-19) पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या पुन्हा वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. या चिंतेदरम्यान सर्वांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लस मंजूर केली आहे. या वयोगटातील मुलांना ही लस (Corona Vaccine for Children) येत्या काही दिवसांत मिळू शकते. जी कोरोनाचा सामना करण्यासाठी खूप महत्वाची मानली जात आहे.

7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाऊ शकते ही लस –

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या तज्ज्ञ पॅनेलने शुक्रवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोवोव्हॅक्स लसीला मान्यता दिली. आता DCGI या शिफारसीचे पुनरावलोकन करेल. त्यांच्या मंजुरीनंतर, ही लस 7-11 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाऊ शकते. लसीच्या आपत्कालीन वापरासाठी कंपनीला ही मान्यता देण्यात आली आहे. ही लस देशभरातील रुग्णालयांमधून मुलांना दिली जाणार आहे.

You may like to read

तज्ज्ञांच्या समितीने लसीला दिली मान्यता –

DCGI च्या तज्ज्ञ पॅनेलने एप्रिलमध्ये झालेल्या शेवटच्या बैठकीत सीरम इन्स्टिट्यूटकडून अर्जावर अधिक माहिती मागवली होती. यानंतर, कंपनीने चाचणीशी संबंधित अधिक डेटा पॅनेलला प्रदान केला. 2 महिने अभ्यास केल्यानंतर, पॅनेलने आता या औषधाला (Covovax Vaccine) मान्यता दिली आहे. याआधी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये, पॅनेलने 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीला काही अटींच्या अधीन राहून मान्यता दिली होती.

देशात कोरोना रुग्णांची वाढतेय संख्या –

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूची प्रकरणे वाढू लागली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग मंदावला होता पण आता जून महिन्यांच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णांच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकार चिंतेत आले आहे. केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांचे आरोग्य मंत्री आणि सचिवांशी बोलून चाचणी वाढवण्याचे आणि उपचार व्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन केले आहे.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>